शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना उद्योग, व्यवसाय करण्याची संधी- कुलगुरू डॉ. भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:22 IST

अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले.

अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले.औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र सरकार, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी (एमएसएनएस) एकत्रितपणे ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत स्टार्टअप इंडिया यात्रेला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यवतीने डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भाले बोलत होते. याप्रसंगी उद्योजक गणेश देशमुख, स्टार्टअपचे राष्ट्रीय फेलो श्रीवास्तव, मुख्यमंत्री प्रतिनिधी उमेश बलवाणी (मुंबई), कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे,विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे, डॉ.एस.आर. काळबांडे, युवा उद्योजक आश्विन पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. भाले यांनी भारत युवकांचा देश असून, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात त्यांना दिशा देण्याचे काम वर्तमान सरकारकडून केले जात आहे. या बळावरच देश महासत्ता होईल, असा विश्वास व्यक्त केला. स्टार्टअप अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला एक केंद्र मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी उद्योजकांनी व्यवसायात, उद्योग उभारताना अडचणी कमी झाल्यानंतर युवकांना उद्योगात उतरता येईल. त्याकरिता उद्योग टाकताना ज्या काही अडचणी येतात, त्या सुलभ होणे गरजेचे आहे. यानंतर श्रीवास्तव यांनी युवकांना याबाबत प्रशिक्षण दिले. अकोला जिल्ह्यातून २५० युवकांची यासाठी निवड करण्यात आली असून, या युवकांनी त्यांच्याकडील उद्योगासाठी लागणारे व विकसित केलेले तंत्रज्ञान, कला सादर करायच्या आहेत. यातून जे तंत्रज्ञान प्रभावी व उपयोगी ठरतील त्याची निवड करण्यात येणार आहे. संचालन संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. काळबांडे यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ