शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अकोला जिल्ह्यातील रोहीत्रे आणि विद्युत खांब झाले वेलीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 13:09 IST

६५८ विद्युत खांब व २३५ रोहित्रांवरील वेली काढल्या

 अकोला : पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीजखांबावर व रोहीत्रावर चढणाऱ्या वेलीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा ठरणाºया व प्रसंगी अपघातालाही निमंत्रण देणाºया वेली व झाडे-झुडूपे काढण्याची मोहिम हाती घेत जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी ६५८ विद्युत खांब व २३५ रोहित्रांवरील वेली काढण्यात आल्या.महावितरणची यंत्रणा उघड्यावरच आणि रानावनात पसरली असल्याने अनेक ठिकाणीरोहीत्रे आणि विद्युत खांब वेली तसेच झुडूपे यांच्या विळख्यात वारंवार अडकतात. यामुळे वीज यंत्रणा असुरक्षित होते. परिणामी थोडी हवा आली तरी खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागते. शिवाय वेली व झुडूपे ही ओली असल्यामुळे यात व खांबाला लावलेल्या तानात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते. हे अपघाताचे कारण बनू नये म्हणून जिल्हयात सुरक्षित वीज यंत्रणेतून वीज पुरवठा करण्यासाठी शनिवार, २६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी मोहीम घेऊन जिल्ह्यातील रोहीत्रे व विद्युत खांबावरील वेली व झाडे-झुडूपे काढण्यात आली.अधिक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला शहर ,अकोला ग्रामिण आणि अकोट विभागाचे कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या मोहिमेत २३० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वेलीमुक्त करण्यात आलेली वीजखांबे व रोहीत्रामध्ये अकोला शहर १८८ वीज खांबे व ९७ रोहीत्राचा समावेश आहे.यावेळी अकोला ग्रामीण विभागातील २६५ वीज खांबे व १०० रोहीत्रे वेलीमुक्त करण्यात आली.तर, हीच संख्या अकोट विभागासाठी अनुक्रमे २०५ व ३८ आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण