शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेऱ्या होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:06 IST

दैनंदिन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, त्यामधून बाहेर येण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तब्बल तीन महिने बंद असल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या परिवहन महामंडळाने यामधून बाहेर येण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. ज्या बसेसच्या फेऱ्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असताना गावात, शहरात धावतात, त्या ठिकाणच्या बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी बसेस बंद असल्याने तसेच आताही बहुतांश जिल्ह्यात एसटीची चाके थांबलेलीच आहेत.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देण्यासही महामंडळाला अडचणी येत असल्याने या आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विविध खर्च कमी करत एसटीला या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.महामंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबत ज्या गावात किंवा शहरात धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी आहेत, त्या बसफेऱ्याच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सध्या जो दैनंदिन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, त्यामधून बाहेर येण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आहे.४० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसफेरीतून खर्चासोबतच महामंडळालाही आर्थिक हातभार लागणार असल्याची खात्री महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना आहे.

२० पेक्षा अधिक प्रवाशांची गरजकोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी एका एसटी बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी याप्रमाणे २३ ते २५ प्रवासी प्रवास करतील असे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र काही गावांमध्ये किंवा शहरात एका बसमध्ये केवळ १० ते १२ च प्रवासी प्रवास करीत असल्याने अशा बसफेºयांमुळे महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेºयांमुळे तोट्यात येणाºया महामंडळाला वाचविण्यासाठी कमीत कमी २० पेक्षा अधिक प्रवासी असणे गरजेचे असल्याचाही निर्णय महामंडळाने घेतला आहे.डिझेलची दरवाढही मुळावरआधीच कोरोनाच्या संकटाने बंद असलेल्या एसटीची चाके फिरण्यास सुरुवात झाली; मात्र त्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. डिझेलची दरवाढ झाल्यानेही एसटीला आणखी फटका बसत आहे. आधीच कमी प्रवासी संख्येवर एसटी बसेस धावत असताना त्यातच डिझेलची दरवाढ झाल्यानेही एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी