अकोला - राष्ट्रीय महामार्गावर मानव हिरो होंडा शारुमच्या समोर बेकायदेशीररीत्या तसेच नियमानुसार न बांधलेल्या गतीरोधकावर नांदेडवरुन अकोला येत असलेली बस आदळल्याने या बसमध्येच असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सदर गतीरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले नसल्यामुळे बसचालकाला हा गतीरोधक दिसला नाही, त्यामूळे बस वेगात असताना आदळली व बसमधील महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्हयातील कंधार येथून एक एसटी बस अकोल्याकडे येत होती. या बसमध्ये कावेरी अशोक स्वामी नामक महिला प्रवासी होती. बुधवारी पहाटे ही बस अकोल्यात आल्यानंतर मानव शोरुमसमोर असलेल्या गतीरोधकावर ही बस आदळली. यावेळी बसमध्ये असलेल्या कावेरी स्वामी या बस आदळल्याने एसटी बसमध्येच सिटवरुन खाली कोसळल्याने त्यांना जबर दुखापत झाली. गंभीररीत्या जखमी असलेल्या स्वामी यांना बसचालकासह प्रवाश्यांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरु केले मात्र दुखापत जास्त असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
अकोल्यात गतीरोधकावर बस आदळली; नांदेड जिल्हयातील प्रवासी वृध्देचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 16:01 IST
अकोला - राष्ट्रीय महामार्गावर मानव हिरो होंडा शारुमच्या समोर बेकायदेशीररीत्या तसेच नियमानुसार न बांधलेल्या गतीरोधकावर नांदेडवरुन अकोला येत असलेली बस आदळल्याने या बसमध्येच असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.
अकोल्यात गतीरोधकावर बस आदळली; नांदेड जिल्हयातील प्रवासी वृध्देचा मृत्यू
ठळक मुद्देनांदेड जिल्हयातील कंधार येथून एक एसटी बस अकोल्याकडे येत होती.गतीरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले नसल्यामुळे बसचालकाला हा गतीरोधक दिसला नाही. बसमध्ये असलेल्या कावेरी स्वामी या बस आदळल्याने एसटी बसमध्येच सिटवरुन खाली कोसळल्याने त्यांना जबर दुखापत झाली.