शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-अकोट मार्गावर बस उलटली; ४७ प्रवाशांचे वाचले प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:21 IST

आगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावर अकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावातील ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेऊन बाहेर काढले.  

ठळक मुद्देअपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झालेपरिसरातील गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले

लोकमत न्यूज नेटवर्कआगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावरअकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावातील ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेऊन बाहेर काढले.  अकोट आगाराची एमएच ४० वाय ५३२८ क्रमांकाची बस अकोला येथून ४७ प्रवासी घेऊन ११ मार्च रोजी सकाळी अकोटकडे जात होती. अकोटकडे जाणारी बस अकोटकडून येणाºया वाहनाला मार्ग देण्याच्या प्रयत्नात उगवा फाट्याजवळ उलटली. या बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करीत होते. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले पाळोदी येथील चेतन शर्मा यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे अकोट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राऊत यांनी त्यांच्या सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ अकोला येथे पाठविले. या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने वाहतूक नियंत्रक विभागाच्या पोलीस कर्मचाºयांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताचे वृत्त समजताच राज्य परिवहन अकोला विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अकोला-अकोट रोडचे रुंदीकरणाचे काम करताना वाहन वाहतुकीची काळजी घेण्यात आली नसल्याने सदर अपघात झाला. जखमींना बाहेर काढण्यासाठी उगवा, आगर, पाचमोरी, पाळोदी येथील अनेक वाहनचालकांनी सहकार्य केले. 

वाहनांच्या लागल्या रांगा अकोट - अकोला मार्गावर आधीच रस्ता दुरुस्तीमुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच बस रस्त्यावरच उलटल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच वाहतूक सुरळीत केली. 

रस्ता रुंदीकरणामुळे एकेरी वाहतूक अकोला-अकोट रोडचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याने सुकोडा फाटा ते उगवा फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे  वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच अपघाताची संख्या वाढली आहे. रविवारी सकाळी पाऊस झाल्याने चालकांच्या अडचणीत वाढच झाली होती.  

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोटstate transportराज्य परीवहन महामंडळ