शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बुलडाणा जिल्ह्याची वीज हानी १८ टक्क्यांवर; १५ टक्क्यांवर आणण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:36 IST

बुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी रोखण्यासाठी वीज रोहित्रावर लावण्यात आलेल्या मीटरचीही उपयोगिता आता सिद्ध होत आहे.

ठळक मुद्देचोर रोखण्याकरिता जिल्ह्यात धडक कारवाई

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी रोखण्यासाठी वीज रोहित्रावर लावण्यात आलेल्या मीटरचीही उपयोगिता आता सिद्ध होत आहे.महावितरणच्या वितरण व्यवस्थेतील गळती आणि वीजचोरी यामुळे वीज हानी निर्माण होते. प्रत्यक्ष पुरविलेली वीज आणि त्याचा मिळालेला मोबदला यात येणारा फरक, हा महावितरणची हानी समजली जाते. वीज हानी कमी करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडून आदेश देण्यात आले असून, त्यानुसार महाराष्ट्रभर महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. वीज हानी टाळण्याकरीता वीज चोरी रोखणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने राज्यभर महावितरणच्या पथकांतर्गत वीजचोरीच्या विरोधात मोहिमा राबविण्यात येत आहेत. गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यात वीज हानी टाळण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न झाले असून, जवळपास १ हजार १९९ वीज चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वीज वितरणातील घट शोधण्यावरही भर देण्यात आला असून, वितरण रोहित्रांना त्याचप्रमाणे फिडरवरही मीटर बसविण्यात आले. गळती कमी करणे आणि वीज चोरी रोखण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आल्याने  सध्या जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यावर आली आहे. त्यामध्ये खामगाव विभागांतर्गत २१.0२ टक्के,   मलकापूर १५.७६ टक्के आणि बुलडाणा १७.३0 टक्क्यावर वीज हानी आहे. ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ मध्ये जिल्ह्याची    २९.७ टक्क्यांवर होती. ती आता १८.४८ टक्क्यावर आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ११.२२ टक्क्याने वीज गळती कमी झाली आहे. 

वीज चोरट्यांकडून पावणे दोन कोटी वसूलवीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी वीज हानी रोखण्यावर भर दिला. जिल्ह्यात वीज चोरट्यांवर धडक कारवाई करून गेल्या दहा महिन्यात १ हजार १९९ वीज चोरट्यांकडून १ कोटी ७३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच १८, १९ व २0 जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीतसुद्धा जिल्ह्यात वीज चोरट्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहीम राबविण्यता आली होती. यामध्ये तीन दिवसात ५१५ वीज चोरट्यांवर करवाई करण्यात आली. 

गळती मार्चपर्यंत १५ टक्क्यांवरवीज गळती सध्या १८.४८ टक्क्यावर आली असून, वीज गळतीचे हे  प्रमाण मार्चपर्यंत १५ टक्क्यांवर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहे. त्यासाठी महावितरणचे विशेष पथकही प्रत्येक भागात काम करत असून, दोन महिन्यात वीज गळतीचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विजेचा पुरवठा करताना होणारी गळती आणि चोरी रोखण्यावर सध्या भर दिला जात आहे. त्यासाठी वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित वीज बिल भरणार्‍या ग्राहकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. जिल्ह्याची वीज हानीची टक्केवारी १८.४८ असून, दोन महिन्यात  आणखी वीज हानी कमी होईल.              - गुलाबराव कडाळे, अधीक्षक अभियंता,महावितरण कंपनी, बुलडाणा

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण