शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील १५४ शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे अर्ज धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:23 IST

बुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत. परंतू आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार असून त्यात पेंडिंगमधील शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी पंपाची प्रतीक्षा असलेल्या शेतकºयांच्या आशा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमुळे पल्लवीत झाल्या आहेत. मुबलक पाणी असूनही अनेक शेतकरी केवळ कृषी पंप नसल्यामुळे शेतीला पाणी देऊ शकत नाहीत. त्यात विद्युत भारनियम असेल तर पुन्हा अडचणी. दिवसभर विद्युत गुल राहत असल्याने रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा होतो. अशावेळेस अनेक शेतकरी रात्रीला शेतात जाऊन पिकांना पाणी देतात. त्यावर शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, त्यामाध्यमातून सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. ८ डिसेंबर २०१७ पासून कृषी पंप वापटपाची योजना बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना महावितरणकडून मिळणाºया कृषी पंपाचा लाभ घेता आला नाही. दरम्यानच्या काळात महावितरणकडे जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. परंतू योजनाच बंद पडल्याने शेतकºयांना कृषी पंपाच्या प्रतीक्षेतच रहावे लागले. परंतू आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय १६ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडाळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात राज्यात एक लाख पंप बसविण्यात येणार असून त्यातील २५ हजार पंप यंदाच्या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहेत. कृषी पंप वितरणात पेंडिंगमधील शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांनी भरलेली अनामत रक्कम शेतकºयांच्या हिश्शात समायोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महावितरण कार्यालयाकडे कृषी पंपासाठी आलेल्या १५४ शेतकºयांच्या अर्जावर विचार होणार असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे. यासंदर्भात महावितरणचे अधिक्षक अभियंता कडाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती