शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

अकोल्यात शिकस्त इमारत कोसळली; जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:07 IST

अकोला: जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त तीन मजली इमारतीचा काही भाग शनिवारी अचानक कोसळला.

अकोला: जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त तीन मजली इमारतीचा काही भाग शनिवारी अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेमुळे जीवितहानी झाली नाही. इमारत शिकस्त झाल्यामुळे महापालिकेने घरमालकाला नोटीस बजावली होती; परंतु घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे महापालिका प्रशासनाने शनिवारी ही इमारत भुईसपाट करण्यास सुरुवात केली.जुने शहरातील विठ्ठल मंदिराजवळ एक तीन मजली जुनी इमारत असून, ही इमारत शिकस्त झाली होती. ही इमारत केव्हाही कोसळू शकते, त्यामुळे महापालिका प्रशासनाने घरमालकाला नोटीस बजावून ही इमारत पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस बरसल्यामुळे या शिकस्त इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह जुने शहर पोलीस, अग्निशमन दल, मनपा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ही इमारत प्रमुख रस्त्यावर असल्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तीन मजली इमारतीमधील विद्युत प्रवाह खंडित करून मनपा बांधकाम विभागाने जेसीबीच्या मदतीने ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले. इमारत पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटनाOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन