शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूरात बीएसएनएलची केबल तुटली; बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:13 IST

मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत.

मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.शहरातील सर्व बँकांनाबीएसएनएल मार्फत नेटवर्क सेवा पुरविली जाते. या नेटवर्कची केबल मुख्य रस्त्यावर जमिनीमध्ये गाडलेली आहे.परंतू मुख्य रस्त्याचे खोदकामाने ही केबल जागोजागी तुटल्याने इंटरनेट सेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे शहरातील सात - आठ बँंकांचे व्यवहार १५ जानेवरी पासून ठप्प झाले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिल्याने बँका व ग्राहकांना कोट्यावधीचे नुकसान सहन करावे लागले.इंटरनेट खंडीत झाल्यामुळे कामकाज ठप्प पडलेल्या बँकांमध्ये बँक आॅफ महाराष्ट्र, अर्बन बँक, मलकापूर अर्बन, जनता बँक, एचडीएफसी, कॅनरा बँक यांचा समावेश आहे. बँकेचे नेटवर्क बंद झाल्याने चेक परत येणे, आरटीजीएस, क्लिअरन्स, पैसे टाकणे, काढणे यासारखे संपुर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. दोन दिवसाचे नुकसान दीड ते दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याची मोघम माहीती एका बँक अधिकाºयाने दिली.

मोजक्या बँकांचे व्यवहार सुरळीतया दोन दिवसात मोजक्याच बँकेचे व्यवहार चालू असुन, या बँकांवर प्रचंड ताण आला आहे. यामध्ये व्हीसॅट यंत्रणेशी जोडल्या गेलेल्या बँकांचा व्यवहार सुरळीत असल्याचे समजते. सदर प्रकार हा जेसीबी मशीनने खोदकाम केल्याने झाला आहे.(शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरBSNLबीएसएनएलInternetइंटरनेटbankबँक