शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड विकणारा दलाल गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 13:01 IST

Akola Crime News मो. इब्राहिम मो. अजीज (रा. मुजफ्फरनगर) नामक दलालाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देटीए ७८ भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनवून, शासकीय प्लॉट विकण्यात आला होता. अध्यक्ष सुरेश काबरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी येथे तक्रार केली होती.

अकोला : एमआयडीसी वाहतूक नगरातील एमआयडीसी प्रशासनाच्या ताब्यातील भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड विकणाऱ्या मो. इब्राहिम मो. अजीज (रा. मुजफ्फरनगर) नामक दलालाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. तसेच बनावट दस्तऐवज तयार करणारा ॲड. राजेश पांचोली आणि त्याचा भाऊ अजूनही फरार असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, अकोला एमआयडीसी ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनवून, शासकीय प्लॉट विकण्यात आला होता. या भूखंडाचे बनावट कागदपत्रे सन ऑगस्ट २०१७मध्ये तयार करून, डिसेंबर २०१७मध्ये अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयाला आग लावून पुरावे नष्ट करण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी प्लॉट ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश काबरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई (अंधेरी) येथे केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशीअंती या भूखंडावर बेकायदेशीर ताबा मिळवून, हा प्लॉट मौजी नामक उद्योजक यांना विकण्यात आला होता, अशी माहिती समोर आली होती. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी अमरावती परिक्षेत्र अधिकारी यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तक्रार देऊन, अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी कर्मचारी अविनाश चंदन, पुरुषोत्तम पेठकर, एरिया मॅनेजर ठोके यांना निलंबित करण्याचे आदेश १४ फेब्रुवारी २०१९ रोजी देण्यात आले होते. त्यानुसार, या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१९च्या रात्री १२.१० वाजताच्या सुमारास हे कर्मचारी आणि तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा वासनिक व सेवानिवृत्त क्षेत्र व्यवस्थापक दिलीप झेंडूजी पाटील तसेच अकोला शहरातील व्यावसायिक विक्रम शहा यांच्या पत्नी कृपा शहा यांना अटक करण्यात आली होती. हे पाचही आरोपी जामिनावर आहेत. ४ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आलेल्या मो.इब्राहिम मो.अजिज याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय सोनोने करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी