पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:51 PM2020-07-07T15:51:59+5:302020-07-07T15:52:11+5:30

निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला.

The bridge built four months ago was uprooted in the first rain! | पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निहिदा : दोनद खुर्द येथील चार महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या पूल पहिल्याच मुसळधार पावसामुळे उखडून गेला आहे. त्यामुळे पुलाच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. यासोबतच परिसरात शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांची शेतजमीन खरडून गेली आहे.
मुसळधार पावसामुळे पूल तर वाहून गेला; परंतु पुलाची उंची न वाढविल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरातील ऊर्मिला देवानंद लाखे, नीलेश कावरे, पंकज टिंगरे, राजू पाटील काकड, दीपक तिवले, सुभाष जामनिक, मनोहर महल्ले, संजय टिकार, यासह अनेक शेतकऱ्यांचे पुलामुळे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम हायब्रीड एन्यूईटी कंपनी करीत असली तरी देखरेखीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले आहे.
पुलाचे बांधकाम सुरू असताना, येथील शेतकºयांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील महल्ले यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली होती; परंतु त्याची अधिकाºयांनी दखल घेतली नाही. पुलाची उंची वाढविली असती तर शेतकºयांची शेतजमीन व पिके खरडून गेली नसती. शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्याकडेही शेतकºयांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार धोत्रे यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पुलाची उंची वाढविण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याकडेही अधिकाºयाने कानाडोळा केला. निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी आणि नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी आणि पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.



दोनद येथील पुलामुळे शेतकºयांची शेती खरडून गेली. शेती नुकसानबाबत पंचनामे करून शेतकºयांच्या मदतीसाठी प्रयत्न करू. उखडलेला पुलाची दुरुस्ती करण्यात येईल.
- उमेश वानखडे, उपअभियंता सा.बां. विभाग, मूर्तिजापूर

Web Title: The bridge built four months ago was uprooted in the first rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.