शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांची १२ कोटी रूपयांची संपत्ती गोठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 05:05 IST

लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केल्यानंतर त्यांची संपत्ती गोठविण्यासाठी तयार केलेला प्रस्ताव शासनाकडे धूळ खात आहे.

- सचिन राऊत अकोला : लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केल्यानंतर त्यांची संपत्ती गोठविण्यासाठी तयार केलेला प्रस्ताव शासनाकडे धूळ खात आहे. विविध विभागाच्या १० प्रकरणांचा संपत्ती गोठविण्याचा हा प्रस्ताव असून, तब्बल ११ कोटी ५९ लाख रुपयांची संपत्ती गोठविण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपन्यांच्या लाचखोर अधिकाºयांना संबंधित जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केलेली आहे. यामध्ये गत दीड वर्षांच्या काळात ज्या लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली त्यांच्या संपत्तीची चौकशी केली असता, त्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे एसीबीच्या चौकशीत समोर आले.त्यामुळे या लाचखोर अधिकाºयांची संपत्ती गोठविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये शासनाच्या केवळ सहा विभागाच्या अधिकाºयांचा समावेश असून, त्यांची ११ कोटी ५९ लाख ८ हजार ९९८ रुपयांची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवीला असून, त्यांच्या मंजुरीनंतर ही संपत्ती गोठविण्यात येणार आहे.या अधिकाºयांच्यासंपत्तीवर टाच येणारमुंबई महानगरपालिकेच्या नगरविकास विभागात कार्यरत असलेल्या तीन लाचखोर अधिकाºयांची ८७ लाख ७४ हजार रुपयांची संपत्ती गोठविण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. तर ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयाची ९ कोटी १३ लाख ३७ हजारांची संपत्ती, ग्रामविकास विभागाच्या अधिकाºयांची ६१ लाखांची संपत्ती, वन विभागाच्या अधिकाºयांची २७ लाखांचीसंपत्ती, महावितरणच्या अधिकाºयांची ५० लाखांची संपत्ती तर आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची १९ लाखांची संपत्ती गोठविण्याचाप्रस्ताव राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शासनाकडे पाठविला आहे.>एकाच अभियंत्याची ९ कोटींची संपत्तीरायगड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत उपविभागीय कार्यालयात असलेला अभियंता गिरीषकुमार पारिक या लाचखोर अभियंत्यास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केल्यानंतर त्याच्याकडे आढळलेली संपत्ती डोळे दीपवणारी होती. त्यामुळे एसीबीने सुमारे ९ कोटी १३ लाख ३७ हजार ४०६ रुपयांची संपत्ती गोठविण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.>विभागनिहाय प्रस्ताव : मुंबई ३, ठाणे १, पुणे १,नाशिक ०, नागपूर १, अमरावती १, औरंगाबाद २, नांदेड १

टॅग्स :MONEYपैसा