शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

१० हजार रुपयांची लाच मागितली; पीएसआयसह तिघे एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:30 IST

अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक शैलेष म्हस्के याच्यासह त्याचा रायटर राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध १० हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या

अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक शैलेष म्हस्के याच्यासह त्याचा रायटर राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध १० हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या तीनही लाचखोरांनी एका इसमाविरुद्ध मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागीतली होती.वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी एका इसमास त्यांच्याकडे चोरीचा मोबाइल असल्याच्या कारणावरून अकोल्यात बोलावण्यात आले. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शैलेश सुरेश म्हस्के आणि त्याचा रायटर राजेश शेंडे व तिसरा पोलीस कर्मचारी या तिघांनी त्यांना चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, शैलेष म्हस्के, राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकात काम करीत असलेला तिसरा कर्मचारी यांनी लाच मागीतल्याचे सिद्ध झाले. म्हस्केसह दोन्ही पोलीस कर्मचाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचल्याचे लक्षात येताच या तीनही जणांनी सदर इसमास मारहाण करीत, त्याच्याकडील रेकॉर्डर तोडले तसेच जबरदस्तीने बंदीस्त केले. या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी केल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी शैलेष सुरेश म्हस्के, राजेश शेेंडे व गुन्हे शोध पथकात काम करीत असलेला तसेच बºयाच वर्षांपासून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या तिसºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक सुधारणा कायद्याच्या कलम ७,७(अ) नुसार तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ (जबरी चोरी), २०१ (पुरावे नष्ट करणे), ३४२ (जबरदस्तीने बंदीस्त करणे) ३४, तसेच ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हॉइस रेकॉर्डरचे मेमरी कार्ड बदललेएसीबीच्या अधिकाºयांनी सापळा रचल्याचे लक्षात येताच पीएसआय शैलेष म्हस्के, राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाºयाने संगनमताने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या व्हाइस रेकॉर्डरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यामधील मेमरी कार्ड बदलण्यात आले. तसेच तक्रारकर्त्यास शिवीगाळ करीत जबरदस्तीने बंदीस्त करून त्यांच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. यावरून तक्रारकर्त्याचा प्रचंड छळ लाचखोर पोलिसांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशन