शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक महिन्यात स्तनपान आठवडा; २०२२ पर्यंत राबविणार मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:27 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत आता दर महिन्याला स्तनपान आठवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला : बालकांच्या संपूर्ण पोषण आहाराचा एक भाग म्हणून देशभरात स्तनपानाला महत्त्व देण्यात येत असून, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत स्तनपान आठवडा पाळण्यात आला; परंतु स्तनपानाविषयी अधिक जनजागृती व्हावी, तसेच स्तनपान ही सामाजिक जबाबदारी व्हावी, या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत आता दर महिन्याला स्तनपान आठवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.बदलत्या काळानुसार स्तनपानाकडे कुटुंबाचे दुर्लक्ष होते. मुळात पुरुषांसोबतच महिलाही नोकरीमध्ये व्यस्त झाल्याने हा प्रकार घडत आहे; परंतु त्याचा थेट इफेक्ट नवजात बालकांच्या पोषण आहारावर पर्यायाने बाळाच्या सर्वांगीण विकासावर होत असल्याचे वास्तव आहे. कामाचा व्याप आणि त्यामुळे स्तनपानासाठी वेळ मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर मात करून प्रत्येक बाळाला आईचे दूध मिळावे, यासाठी तिच्या कुटुंबासह प्रत्येक घटकाने याकडे एक सामाजिक जबाबदारी म्हणून बघण्याची गरज आहे. तिच्या कामाच्या ठिकाणीही तिला स्तनपानासाठी पाठिंबा द्यायला हवा, स्तनपानाला प्रोत्साहन मिळावे, याच दृष्टिकोनातून स्तनपानासंदर्भातील जनजागृती केवळ आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातपुरता मर्यादित न राहता, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनजागृती आठवडा म्हणून राबविण्याचा निर्धार केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा उपक्रम २०२२ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.‘सप्टेंबर’मध्येही स्तनपान जनजागृतीपोषण आहार कार्यक्रमांतर्गत सप्टेंबर महिन्यातदेखील अकोल्यात स्तनपानाविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.स्तनपानाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. नुकताच १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत स्तनपान आठवडा राबविण्यात आला आहे; मात्र दर महिन्यात स्तनपान आठवडा राबविण्याबाबत अद्याप निर्देश आले नाहीत. तसे निर्देश येताच दर महिन्याला स्तनपान जनजागृती आठवडा राबवू.- डॉ. आरती कुलवाल, अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य