शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पोळा उत्सवाची दीडशे वर्षांची परंपरा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 10:16 IST

कोरोना महामारीमुळे दीडशे वर्षांची पोळा उत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली आहे.

- सदानंद खारोडे लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव बाजार: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे श्री सोमेश्वर मंदिर असून, येथे दरवर्षी पोळ्यानिमित्त यात्रा भरते. दीडशे वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा प्रथमच कोरोनामुळे खंडित होणार आहे. पोळ्याच्या निमित्ताने भरणाऱ्या यात्रेत बारा गावांचे शेतकरी बैलजोड्यांना सजवून सोमेश्वराच्या दर्शनासाठी येऊन उत्सवात सहभागी व्हायचे; परंतु यंदा गावस्तरावरच पोळा उत्सव साजरा होणार आहे.दरवर्षी पोळ्यानिमित्त गावातून सजविलेल्या वृषभराजांची मिरवणूक निघायची. गावात मोठी यात्रा भरायची; परंतु कोरोना महामारीमुळे दीडशे वर्षांची पोळा उत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली आहे. तळेगाव बाजार येथे श्री सोमेश्वर मंदिर असून, येथे पुरातन काळापासून पोळ्याच्या दुसºया दिवशी गावा-गावातून शेतकरी आपले बैल सजवून श्री सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणतात. अकोली, हिंगणी बु., हिंगणी खु.,मालठाणा, काळेगाव, रायखेड, गोर्धा, घोडेगाव, चांगलवाडी, बेलखेड, हिवरखेड आणि तळेगाव बाजार येथील शेतकरी आपले बैल सजवून ढोल-ताशा पथकासह मिरवणुकीत सहभागी व्हायचे. दिवसभर हा उत्सव चालायचा. नंतर सायंकाळी पाच वाजता सोमेश्वर मंदिर परिसरात सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात यायचा. सदर उत्सव केव्हापासून चालू आहे, असे गावातील वृद्ध नागरिकांना विचारले असता, त्यांनी सदर उत्सव पुरातन काळापासून नियमितपणे चालू असल्याचे सांगितले; परंतु यंदा कोरोनामुळे पोळा उत्सव होणार नाही. गावस्तरावरच पोळा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.यावर्षी कोरोनामुळे गावातील पोळ्यानिमित्त साजरा होणारा द्वारका उत्सव बंद राहणार आहे. त्यामुळे गावात बैलजोड्यांची मिरवणूक निघणार नाही.-संतोष खारोडे,अध्यक्ष सोमेश्वर संस्थान तळेगाव बाजार.पोळ्यानिमित्त होणाºया द्वारका उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे; परंतु यंदा प्रथमच उत्सव खंडित झाला आहे. गावस्तरावरच पोळा सण साजरा होणार आहे.-मधुकरराव राऊत, संचालक, सोमेश्वर संस्थान, तळेगाव बाजार.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सणcorona virusकोरोना वायरस बातम्या