शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:01 IST

शेगाव-पारस-अकोला-वाडेगाव-डव्हा-रिसोड-किनगावजट्टू-बीबी या मार्गावर वाहनधारकांना धुळीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचा भाग असलेल्या अकोला-वाशिम-बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्याचे काम कमालीचे संथ गतीने सुरू आहे. या कामाची गती वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. यांना वर्षभरात ३९ पत्रे दिल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. शेगाव-पारस-अकोला-वाडेगाव-डव्हा-रिसोड-किनगावजट्टू-बीबी या मार्गावर वाहनधारकांना धुळीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. त्यासोबतच ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी मोड’ अंतर्गत सुरू असलेल्या इतर तीन रस्त्यांची कामेही याच पद्धतीने सुरू असून, विकास नको, प्रवाशांचे जीव वाचवा, असेच म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंढरपूर-शेगाव पालखी मार्गाची सुधारणा केली जात आहे. या रस्त्याच्या दुपदरीकरणासोबत दोन्ही बाजंूना पादचारी मार्ग तयार केला जात आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील ८२ किमीचे काम निविदेतून नागपूर येथील मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. यांना मिळाले. ५ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यारंभ आदेशानुसार २४ महिन्यांत ते पूर्ण करण्याची मुदत आहे. तसेच ठरल्याप्रमाणे फेब्रुवारी २०२० मध्ये २५.६२ टक्क्यांऐवजी १८ टक्केच पूर्ण झाले आहे. कंत्राटदार कंपनीने या रस्त्याच्या दोन्ही बाजंूना खोदून मातीकाम केले. त्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून कामही जवळपास बंदच ठेवले. त्यामुळे या रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत. त्याचा दुचाकीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातूनच अपघाताची संख्याही वाढली आहे.

- तीन जिल्ह्यांतील वाहनधारकांना त्रासपालखी मार्गानुसार अकोला-वाशिम-बुलडाणा जिल्ह्यांतील रस्त्याचा समावेश असलेल्या शेगाव-नागझरी-पारस-निमकर्दा-गायगाव-अकोला-गोरेगाव-वाडेगाव-डव्हा-रिसोड-लोणी-बीबी-किनगावजट्टू यादरम्यान ३७१ कोटी रुपये खर्चातून हे काम केले जात आहे. काम थंडबस्त्यात असल्याने ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या मुदतीत पूर्ण होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

- कापशी-कारंजा रस्त्याचे कामही थांबले!‘एचएएम’अंतर्गत असलेल्या कापशी-बार्शीटाकळी-पिंजर-कारंजा या ४८ किमी रस्त्याच्या कामाच्या करारनाम्यानुसार तीन टप्पे पूर्ण झाले. आता निधी नसल्याने ते थांबले आहे.

- आडसूळ-तेल्हारा, माळेगाव-अकोटचाही गोंधळसुधीर कन्स्ट्रक्शन्सकडे तेल्हारा-अकोला मुख्यालय जोडणाऱ्या तेल्हारा-आडसूळ-गांधीग्राम रस्ता, सोबतच वरवट बकाल-माळेगाव बाजार-तेल्हारा-मुंडगाव-अकोट या रस्त्यांची कामेही आहेत. त्या रस्त्यांचीही पालखी मार्गासारखीच अवस्था झाली आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाhighwayमहामार्ग