शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

पदोन्नतीसाठी बीपीएड्-बीएड्मध्ये भेदभाव करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:35 PM

मुख्याध्यापकपदी पदोन्नती करताना बीपीएड् व बीएड्धारकांमध्ये भेदभाव करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

अकोला: यापुढे मुख्याध्यापकपदी पदोन्नती करताना बीपीएड् व बीएड्धारकांमध्ये भेदभाव करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जे शिक्षक शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून लागले म्हणजेच फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (पीटीआय)व फिजिकल एज्युकेशन टीचर(पीईटी) या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान न्यायाधीश रोहित देव यांनी दिलेल्या आदेशामध्ये, याचिकाकर्ता शिक्षक १ जुलै २०१० पासून मुख्याध्यापक पदाकरिता पात्र आहेत. या तारखेपासून ही जागा रिकामी झाली, तेव्हापासून याचिकाकर्त्याला सर्व लाभ दयावे,असे म्हटले आहे. याचिकाकर्ता पंडित राजाराम वानखेडे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव या गावातील आहेत. वानखेडे हे बोरगाव मंजू येथील परशुराम नाईक विद्यालयात शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते या विद्यालयात वरिष्ठ होते. मुख्याध्यापक पद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे बीएड्ची पदवी नसल्यामुळे त्यांना मुख्याध्यापकपदी नियुक्ती देण्यात आली नाही; परंतु ते बीपीएड् होते. बीएड् नसल्यामुळे मुख्याध्यापकपद देता येणार नाही, असे शाळेच्या व्यवस्थापनाचे म्हणणे होते. व्यवस्थापनाच्या निर्णयाविरुद्ध वानखेडे यांनी अमरावती येथील स्कूल ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली. व्यवस्थापनाचे म्हणणे ट्रिब्युनलने ग्राह्य धरले. इतर विषय वानखेडे शिकवित असले, तरी ते बीएड् नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देता येणार नाही. कारण त्यांना इतर विषय शिकविण्याचा अजिबात अनुभव नाही, असे ट्रिब्युनलने आदेशात नमूद केले.स्कूल ट्रिब्युनलच्या आदेशाला शिक्षक वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान, शारीरिक शिक्षण शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती करता येते का, हा प्रश्न निर्माण झाला होता. न्या.रोहित देव यांनी मुख्याध्यापकपदी पदोन्नती करताना बीपीएड् व बीएड्मध्ये मुळीच भेदभाव करता येणार नाही. वानखेडे यांना पदोन्नती बेकायदेशीरपणे नाकारण्यात आली. ते मुख्याध्यापक पदाकरिता पात्र आहेत. उच्च न्यायालयाने अनेक न्यायालयीन प्रकरणांचा दाखला दिला, तसेच त्यांनी शासकीय निर्णयाचा आधार घेऊन अमरावती स्कूल ट्रिब्युनलचा आदेश खारीज केला. याचिकाकर्तातर्फे नागपूरचे अ‍ॅड़ ए. शेलट यांनी बाजू मांडली. या निर्णयाचे स्वागत शारीरिक शिक्षण शिक्षकांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHigh Courtउच्च न्यायालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र