शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

 प्रियकराचा लग्नास नकार...प्रेयसीने भरचौकात घेतला विषाचा घोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 14:19 IST

अकोला: दीड वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे, या जिद्दीने पेटलेल्या प्रेयसीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने या युवतीने भरचौकात विष प्राशन केल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजता नेहरू पार्क चौकात घडली.

ठळक मुद्देप्रेयसीने शुक्रवारी प्रियकराकडे परत लग्नाचा तगादा लावला. ती पवनच्या गावात आली आणि ती त्याला शनिवारी दुपारी नेहरू पार्क चौकात भेटली. तिथेच तिने पवनला लग्नासाठी तगादा लावला.

अकोला: दीड वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे, या जिद्दीने पेटलेल्या प्रेयसीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने या युवतीने भरचौकात विष प्राशन केल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजता नेहरू पार्क चौकात घडली. प्रेयसीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील कारवाई करीत आहे. दरम्यान, लग्नासाठी त्रास देत असल्याची तक्रार शुक्रवारी प्रियकराने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. तसेच प्रेयसीनेही त्याला ५ वर्षात नोकरी लागली तर त्याच्याशी लग्न करणार असल्याचे लिहून दिले आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील खेट्री येथील रहिवासी पवन हा युवक अमरावती येथे करिअर पॉइंट अकॅडमी येथे शिकण्यासाठी गेला. तिथे त्याची ओळख सोनाली हिच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली. पवनने नोकरी लागल्यानंतर लग्न करू, असे तिला सांगितले. तिने सुरुवातीला हो म्हटले. तिने लग्नाचा तगादा लावला. तसेच २४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर लिहिले ते २०२४ पर्यंत नोकरी लागल्यानंतर लग्न करेल किंवा तिच्या सोबत राहील. त्यानंतर परत त्यांच्यामध्ये लग्नाच्या कारणावरून चर्चा सुरू होती; परंतु प्रेयसीने शुक्रवारी प्रियकराकडे परत लग्नाचा तगादा लावला. तसेच ती पवनच्या गावात आली आणि ती त्याला शनिवारी दुपारी नेहरू पार्क चौकात भेटली. तिथेच तिने पवनला लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिला परत तेच सांगितले तरीही ती ऐकत नव्हती. तिने स्वत:जवळील पाण्याची शिशी काढली. त्यात असलेले विष प्राशन केले. हा प्रकार पाहून त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी