शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने केली विधवा प्रेयसीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:18 IST

मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोत्रा शिंदे येथे प्रियकराने विधवा प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता धोत्रा शिंदे येथील बस थांब्यावर घडली.

मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोत्रा शिंदे येथे प्रियकराने विधवा प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता धोत्रा शिंदे येथील बस थांब्यावर घडली. सविता अंकुश दुधे असे मृतक महिलेचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.धोत्रा शिंदे येथील सविता अंकुश दुधे (३२) हिच्या पतीचे दोन वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. त्यामुळे ती आपल्या दोन चिमुकल्यांसह धोत्रा शिंदे येथे राहत होती. पतीच्या निधनानंतर तिचे गावातील धनराज प्रल्हाद साठे (२५) याच्या सोबत अनैतिक संबंध जुळून आले. सदर महिलेला जीवन विमा निगम कडून पतीच्या निधनानंतर मोठी रक्कम मिळाली. या रकमेवर धनराज याची नजर होती. त्या रकमेतून काही हिश्शाची मागणी धनराज वारंवार करत असे; परंतु सविता हिने त्यातील रक्कम देण्यास साफ नकार दिला होता. या पैशाच्या वादातूनच आरोपी धनराजने सविताची चाकूचे वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.सविता ही मूर्तिजापूर येथील आपली कामे आटोपून आपल्या गावी धोत्रा शिंदे येथे आॅटोरिक्षाने सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान परत गेली; परंतु तिला कुठल्याही गोष्टीची कुणकुण न लागू देता पूर्वीपासूनच बसथांब्यावर दबा धरून बसलेल्या आरोपी धनराज याने अ‍ॅटोतून उतरलेल्या सवितावर चाकूचे सपासप वार केले. पहिला वार गळ्यावर जोरदार झाल्याने सविता रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी धनराज साठेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे व ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)अनाथ झाले बंटी, बबलूदोन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाल्याने वडिलांचे छत्र हरविल्या गेले. त्यानंतर बंटी ६ वर्ष व बबलू ३ वर्ष ही दोन चिमुकली आईच्या कुशीत वाढली. आजच्या या घटनेने दोन्ही चिमुकले पोरकी झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पुढे या दोन चिमुकल्यांचा सांभाळ क रायचा कोणी, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी