शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्ट्यवधींच्या कर्जाचे आमिष देऊन आर्थिक गंडा घालणारे गुजरातमधील दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:58 IST

अकोला : गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक व एजंटांनी अकोल्यातील गीता नगरमधील एका व्यापाऱ्यास कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देऊन त्यांची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे

ठळक मुद्देविजय आनंदराय मेहता यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी शहरातील काही बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले.कंपनीचा अकोल्यातील एजंट दिलीप वीरेंद्र चौरसीया याच्यामार्फत २ लाख ५० हजार रुपये सदर कंपनीमध्ये जमा केले. एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कर्जाची रक्कम देण्यात आली नाही.

अकोला : गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक व एजंटांनी अकोल्यातील गीता नगरमधील एका व्यापाऱ्यास कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देऊन त्यांची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना जुने शहर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गीता नगरातील रहिवासी विजय आनंदराय मेहता यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी शहरातील काही बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यांना कर्ज मिळाले नाही. अशातच त्यांना भ्रमणध्वनीवर कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देण्यात आले. त्यांनी सखोल माहिती घेतली असता गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करीत असल्याचे समोर आले; मात्र त्यासाठी सुरुवातीला काही रक्कम खातेदाराला त्यांच्या कंपनीकडे जमा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यावर विश्वास ठेवत विजय मेहता यांनी या कंपनीचा अकोल्यातील एजंट दिलीप वीरेंद्र चौरसीया याच्यामार्फत २ लाख ५० हजार रुपये सदर कंपनीमध्ये जमा केले. त्यानंतर पुन्हा २ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कमही सदर कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. पाच लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केल्यानंतर त्यांना एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कर्जाची रक्कम देण्यात आली नाही. कंपनीने त्यांची टाळाटाळ सुरू करताच फसवणूक झाल्याचे मेहता यांच्या लक्षात आले. त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सदर कंपनीच्या संचालकासह एजंटविरुद्ध २४ जुलै २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये कुणाल प्रेमकिशोर चौरसीया, दिलीप वीरेंद्र चौरसीया, जसूभाई नारायणभाई परमार ऊर्फ वनकर ३५ उत्सव कॉलनी गोध्रा गुजरात, जयेश कुमार बाबूभाई पटेल ४२ बडोदा गुजरात यांचा समावेश आहे. यामधील जसूभाई नारायणभाई परमार, जयेश कुमार बाबूभाई पटेल या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, अनिस पठाण, सुभाष राठोड, धनराज ठाकूर, महिला कर्मचारी शैला खंडारे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी