शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

हाडांच्या ठिसुळतेमुळे वाढतोय ‘आॅस्टियोपोरोसिस’चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:50 IST

डॉक्टरांच्या सल्ल्याने हाडांची नियमित तपासणी करा.

अकोला : कॅल्शिअम व खनिजांच्या अभावामुळे हाडांच्या ठिसुळतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढू लागले आहे. हाडांच्या ठिसुळतेमुळे ‘आॅस्टियोपोरोसिस’ या आजाराचा धोका वाढला आहे. ही समस्या प्रामुख्याने वयाच्या चाळिशीनंतर अनेकांना त्रस्त करीत असल्याने वेळीच सावध होण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे खानपान आणि व्यायामाकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांच्या शरीरात ‘कॅल्शिअम’ आणि व्हिटॅमिन डी’ची कमी उद्भवू लागली आहे.सामान्यपणे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांकडून सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा आल्याची तक्रार केली जाते. हालचाल केली की ती वाढते आणि विश्रांती घेतली की कमी होते. ‘आॅस्टियोपोरोसिस’ हा आजार लवकर दिसून न येणारा आजार आहे; मात्र हाडांची ठिसुळता वाढल्यावरच त्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे निदान लवकर होत नाही. वयाची चाळिशी ओलांडलेल्या महिला व पुरुषांमध्ये हात-पाय दुखण्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘आॅस्टियोपोरोसिस’ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे खानपान आणि व्यायामाला प्राधान्य देऊन हाडांची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर करतात. शरीरात ‘कॅल्शिअम’ आणि व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे ‘आॅस्टियोपोरोसिस’चा धोका वाढतो. त्यामुळे ‘कॅल्शिअम’ आणि व्हिटॅमिन डी’युक्त आहार सेवन करण्याचा सल्लाडी तज्ज्ञ डॉक्टर देतात.ही आहेत कारणे

  • ‘कॅल्शियम’ व ‘व्हिटॅमिन डी’ची कमी
  • थायरॉइडची समस्या एस्ट्रोजन
  • हार्मोन्सची कमतरता किंवा बॅलन्स बिघडणे
  • शारीरिक हालचालींची, व्यायामाचा अभाव
  • अयोग्य आहार

ही आहेत लक्षणे...

  1. हाताचे हाड, कंबर आणि खांदे दुखणे ही प्राथमिक लक्षणे सांगितली जातात.
  2. प्रमुख लक्षणे हाडांना फ्रॅ क्चर झाल्यानंतरच दिसून येतात.
  3. मनुष्याची हाडे मजबूत असल्याने सहज मोडत नाहीत;
  4. मात्र या आजारामुळे ठिसूळ झालेली हाडे लवकर मोडतात.

हे करा...

  • सकाळचे कोवळे ऊन घ्या.
  • मासे, दूध नियमित घ्या.
  • नियमित व्यायाम करा.
  • गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या.

आॅस्टियोपोरोसिस म्हणजेच हाडांच्या ठिसुळतेची लक्षणे सहजासहजी दिसून येत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हाडांची नियमित तपासणी करा. तसेच कॅल्शिअम व व्हिटॅमिन डी युक्त आहार आणि नियमित व्यायाम करा.- डॉ. अमोल रावणकर, अस्थिरोग तज्ज्ञ, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यdoctorडॉक्टर