शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात कापसावर आली बोंडअळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:21 IST

अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व (पऱ्हाटी) कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळीने चाल केली.

अकोला : पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) अपेक्षित दमदार पाऊस पडला नाही; परंतु पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व (पऱ्हाटी) कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळीने चाल केली असून, या अळीच्या व्यवस्थानासाठी आणखी खर्च वाढणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पाऊस उशिरा आला असला तरी काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संरक्षित ओलिताच्या भरवशावर मान्सूनपूर्व तर काहींनी १० जूनपर्यंत कपाशीची पेरणी केली. मान्सूनपूर्व पेरणी करणाºया शेतकऱ्यांचा आकडा १५ ते २० टक्के असून,८० टक्के शेतकºयांनी २० जूननंतर पेरणी केली आहे. ज्यांनी याअगोदर पेरणी केली, त्या पऱ्हाटीला आजमितीस फुले, पात्या डोमकळ्या आल्या आहेत. त्यावर आतापासूनच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी बोंडअळीने विदर्भातील कपाशीचे जवळपास ४० टक्क्यांवर नुकसान केले होते. यावर्षी पुन्हा मान्सूनपूर्व कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या अळीचा प्रसार वेगाने होतो. म्हणूनच २० जूननंतर पेरणी केलेल्या कपाशीवर प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.विदर्भात यावर्षी अमरावती विभागात १० लाख ८६ हजार ६४६ तर नागपूर विभागात ६ लाख ५० हजार ५८४ हेक्टरवर एकूण १७ लाख ३७ हजार ५८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकºयांनी कपाशी पिकाला पसंती देत यावर्षी ७० हजारांवर कपाशीचे क्षेत्र वाढविले. यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे कपाशीचे क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी गतवर्षी बोंडअळीवर मिळविलेले नियंत्रण व दरही चांगले मिळाल्याने शेतकºयांचा यावर्षी कपाशी पिकाकडे कल वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.अता त्यांच्यापुढे बोंडअळीचे संकट उभे ठाकले आहे.

- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कपाशीवर प्रदुर्भाव दिसून आला आहे. शेतकºयांनी घाबरू न जाता गुलाबी बोंडअळी दिसल्यास ते फूल, डोमकळी तोडून नष्ट करावी, प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मिश्र घटकाची फवारणी करावी.डॉ. डी. बी. उंदीरवाडे,विभाग प्रमुख,कीटकशास्त्र,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी