शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:15 IST

अकोला : अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

अकोला : अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना न्यू तापडिया नगरातील नवनाथ महाराजांच्या मंदिर परिसरात उघडकीस आली. सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही 15 दिवसातील तिसरी खळबळजनक घटना आहे. या तरुणाचा खून करुन मृतदेह येथे फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. न्यू तापडिया नगरातील नवनाथ मंदिर परिसरात पोलीस पाटील गणेश अडकणे व त्यांचे सहकारी फिरत होते. त्यावेळी त्यांना तिथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्यांनी सिव्हील लाईन पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी श्वान पथक आणि मोबाईल कारही दाखल झाली.मृतदेह अर्धवट जळालेला असून त्याच्याजवळ एक स्लीपर सापडली आहे. हा खून असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मृताची ओळख आद्यप पटू शकली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसांपूर्वी किसनराव हुंडीवाले यांचा 6 मे रोजी चॅरिटी कमिश्नर कार्यालयात खून झाला होता. त्यानंतर 9 मे रोजी त्याच कार्यालयातील सफाई कर्मचारी मोहन संकत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन