शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा अखेर मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:45 IST

तिचा मृतदेह उमा नदीपात्रात रोहणा पुलाच्या खाली सापडला. 

मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही - लंघापूर येथील शिलाबाई अशोक मुळे ही महिला पोही गावालगत असलेल्या खरकाडी नाल्याच्या पुरात ७ जुलैला वाहून गेली होती. आज ९ जुलैचे सकाळी ११ वाजता तिचा मृतदेह उमा नदीपात्रात रोहणा पुलाच्या खाली सापडला. दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर शासकीय आपत्कालीन पथकाने तीन दिवस अथक शोधमोहीम राबविली,पोही गावापासून १५ किलोमीटर उमा व पूर्णा नदीपात्रात लाईत, सेलू बोंडे, लाखपुरी सांगवी घुंगशी बॅरेजपर्यंत शोधमोहीम राबविली, येवढ्या प्रयत्नानंतर पोहीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहणा पुलाखाली महिलेचा मृतदेह आज ९ जुलैच्या सकाळी दिसून आला. आपत्कालीन पथक दुसरीकडे शोधात असताना रोहणा येथील प्रल्हाद बनसोड हेही महिलेचा शोध घेत होते पुलाखाली उतरले असता त्यांना तिथे दुर्गंधी आल्याने शोध घेतला असता पुलाखाली काट्यावर अडकून पडलेला मृतदेह आढळून आला.मृतदेहाची घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली असून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. अधिक तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील, पो. कॉ. विनोद तायडे, संदीप पवार, प्रवीण ठाकरे, महिला पो. कॉ. उज्ज्वला इंगोले करीत आहे.

टॅग्स :Akolaअकोला