शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

इंग्रजी शाळा प्रवेशासाठी हवे ब्लड रिलेशन

By admin | Updated: April 26, 2017 01:42 IST

शिक्षण महागले: शाळा प्रवेशाचे भूत पालकांच्या मानगुटीवर

अकोला : शहरातील अनेक शाळांमध्ये परीक्षा आटोपल्या आहेत, तर काही शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. त्याअगोदरच पालकांची नव्या शैक्षणिक सत्रासाठी तयारी सुरू झाली आहे. सध्या पालकांचे आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मिशन अ‍ॅडमिशन सुरू झाले आहे. सर्वच स्तरातील पालकवर्ग आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी जीवाचे रान करताना दिसतोय; परंतु शाळांचे डोनेशन, ब्लड रिलेशनसोबतच अनेक अटी शाळांनी घातल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. २७ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी शाळांनी प्रवेश क्षमता पूर्ण करण्याची तयारी केली आहे. जवळपास सर्व पालकांनीसुद्धा शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करून घेण्यात गुंतले आहेत. २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यासाठी पालक अक्षरश: धडपड करीत आहेत. त्यासाठी वाट्टेल तेवढे डोनेशन देण्याची त्यांची तयारी दिसून येत आहे. शहरातील जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांसोबतच खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे; परंतु शाळांनी जाचक अटी पालकांवर लादल्या आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमध्ये मुलाला प्रवेश देण्यासाठी ब्लड रिलेशन आणि प्रवेशपूर्व परीक्षेसारख्या समस्यांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. काही शाळांमध्ये तर प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी फलकावर लावण्यात येते. ब्लड रिलेशनमधील नातेवाइकाला शाळेपर्यंत नेऊन प्रवेशासाठी गळ घालण्यात येत आहे. आपल्या मुलांकडून प्रवेशपूर्व परीक्षेची तयारीसुद्धा करून घेताना काही दिसत आहेत, तर काही ठिकाणी पालकांसह विद्यार्थ्यांच्यासुद्धा मुलाखती घेतल्या जात आहेत. एवढी ही शाळा प्रवेशाची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. खासगी शाळांनी स्वत:साठी तयार केलेल्या नियमांकडे प्राथमिक शिक्षण विभाग डोळेझाक करीत असल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभाग म्हणतो, पालक तक्रारच करीत नाहीत!शहरातील अनेक खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी भरमसाट डोनेशन स्वीकारले जाते, तसेच ब्लड रिलेशन असेल तरच प्रवेशासाठी अर्ज करावा, अशा अटी शाळांकडून लादल्या जातात आणि पुढील वर्गासाठीही दरवर्षी भरमसाट शुल्क उकळल्या जाते, अशा पालकांच्या तक्रारी असतात. यासंदर्भात शिक्षण विभागासोबत संपर्क साधल्यावर पालक आमच्याकडे तक्रारच करीत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.वारंवार घडतो गुन्हा, शिक्षण विभाग ढिम्मशिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी डोनेशन घेणे गुन्हा आहे; परंतु शाळांकडून दरवर्षी भरमसाट डोनेशन उकळल्या जाते, तसेच पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात शिक्षण शुल्क लाटल्या जाते. त्यातही काही शाळांकडून दरवर्षी १० ते १५ टक्के वाढ केली जाते; परंतु यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. पालकांकडून तक्रारीची अपेक्षा केली जाते.सख्खा भाऊ, बहिणीलाच प्रवेशअनेक इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांनी शिक्षण हक्क कायद्याला केराची टोपली दाखवित स्वत:चे नियम बनविले आहेत. ब्लड रिलेशनमधील सख्खा भाऊ, बहिणीलाच आम्ही प्रवेश देऊ, असे सांगितले जाते; परंतु चुलतभाऊ, बहिणीला मात्र शाळेत प्रवेश नाकारण्यात येतो, अशी परिस्थिती आहे. शाळांच्या स्वयंघोषित नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते.