शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

जिल्हा परिषदेची जागेसाठी आंधळी कोशिंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:06 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगाव येथील जमिनीवर अतिक्रमण करीत ती जमीन बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचा आरोप करणारी नोटीस जिल्हा परिषदेने शेगावस्थित बालाजी असोसिएटसच्या भागीदारांना बजावली असली तरी जागेचा स्थळदर्शक अहवाल, महसुली पुराव्यांची पडताळणी न झाल्याने जमीन ताब्यात घेण्यात जिल्हा परिषदेचा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देनोटीसमुळे बालाजी असोसिएट्स, पुसद अर्बन बँकेला धक्कातहसील, भूमी अभिलेखचा असहकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगाव येथील जमिनीवर अतिक्रमण करीत ती जमीन बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचा आरोप करणारी नोटीस जिल्हा परिषदेने शेगावस्थित बालाजी असोसिएटसच्या भागीदारांना बजावली असली तरी जागेचा स्थळदर्शक अहवाल, महसुली पुराव्यांची पडताळणी न झाल्याने जमीन ताब्यात घेण्यात जिल्हा परिषदेचा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.शेगाव भाग-२ मधील सर्व्हे क्रमांक ३४३। ४ मध्ये ८३ आरचा पोटहिस्सा जिल्हा कौन्सिल अकोलाच्या नावे आहे. या जमिनीच्या मालकी हक्काबाबत सात-बाराशिवाय इतर महसुली पुरावे जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्याचवेळी त्या सर्व्हे क्रमांक ३४३। ४ (अ) मध्ये १ हेक्टर २ आर जमीन बालाजी असोसिएट्सच्या भागीदारांनी खरेदी केलेली आहे. त्या जमिनीचा वाणिज्यिक विकास करण्यासाठी पुसद अर्बन को-ऑप. बँकेने शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्स या भागीदारी प्रतिष्ठाणला कर्ज दिले आहे. त्याची नोंदही प्रतिष्ठाणच्या तीन भागीदारांच्या नावे असलेल्या स्वतंत्र सात-बारावर घेण्यात आली, तर त्याचवेळी अकोला जिल्हा कौन्सिलच्या नावे असलेल्या सात-बारावर कोणताही बोजा नसल्याची नोंद आहे. या स्वतंत्र सात-बाराच्या आधारे जिल्हा परिषदेला मालकी हक्क आणि स्थळ निश्‍चिती करून जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने बालाजी असोसिएट्सचे भागीदार राजेश मदनमोहन मुना, संजय भगवानदास नागपाल रा. धानुका ले-आउट रोड शेगाव, मीनाक्षी रामविजय बुरूंगले, धनगर फैल शेगाव यांना नोटीस बजावली. त्यामध्ये सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवा, सोबतच अतिक्रमणाच्या जागेवर केलेले बांधकाम आठ दिवसांत पाडून टाका, असे म्हटले आहे. या नोटिसमुळे बालाजी असोसिएट्सच्या भागीदारांसोबतच पुसद अर्बन को-ऑप. बँकेलाही धक्का बसला आहे. 

तहसील, भूमी अभिलेखचा असहकारजिल्हा परिषदेच्या यंत्रणेने जमिनीचा मालकी हक्क, स्थळदर्शक अहवाल, नकाशा, चतु:सीमा नकाशा याबाबतची माहिती सातत्याने शेगाव तहसील, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून मागवली. मोजणी करण्यासाठी सदर पुरावे आवश्यक आहेत; मात्र तेथून माहितीच मिळत नसल्याने जिल्हा परिषदेवर अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे. 

आम्ही आमच्या मालकीच्या जागेवरच बांधकाम केले आहे. ती जागा तारण ठेवूनच बँकेकडून कर्ज घेतले आहे. जिल्हा परिषदेने जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी, महसुली पुरावे घ्यावे, मोजणी करावी. त्यामध्ये बालाजी असोसिएट्सच्या भागीदारांचे सहकार्य राहणार आहे. जागेच्या स्थळ निश्‍चितीसाठी पुराव्यांचीही पडताळणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल. - राजेश मुना, बालाजी असोसिएट्स.