शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

काळीपिवळीची धडक; एक ठार महिलेसह काळीपिवळीचा चालक जखमी

By admin | Updated: June 3, 2014 01:52 IST

अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. सस्ती येथील राहणारे सिद्धार्थ शिवहरी अंभोरे हे त्यांची पत्नी संगीता अंभोरे हिला घेऊन एमएच ३0 डब्ल्यू ९५८८ क्रमांकाच्या मोटारसायकलने मालेगावहून लग्न समारंभ आटोपून अकोल्याकडे येत होते. दरम्यान समोरून भरधाव येणार्‍या एमएच ३0 बी २५९६ क्रमांकाच्या काळीपिवळी टॅक्सीने त्यांच्या मोटारसायकलला पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ जोरदार धडक दिली. यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. सिद्धार्थ अंभोरे व त्यांच्या पत्नीला सवार्ेपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी सिद्धार्थ अंभोरे यांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली त्यांची पत्नी व काळीपिवळी टॅक्सीचा चालक यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सिद्धार्थ अंभोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष (ग्रामीण) होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सवार्ेपचार रुग्णालयात मोठी गर्दी केली. *** ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक, एकजण ठार, एक गंभीरट्रॅक्टरने मोटारसायकला दिलेल्या धडकेमध्ये युवक ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास आपातापा रोडवर घडला. मारोडी येथील अश्विन गणेश खोडके (२0) आणि त्याचा सहकारी ज्ञानेश्वर प्रल्हाद चव्हाण (२७) हे दोघे सायंकाळी आपातापा येथे गेले होते. त्यांचे काम झाल्यानंतर दोघेही मोटारसायकलने घरी जाण्यासाठी परतत होते. आपातापा रोडवर समोरून येणार्‍या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात अश्विन व ज्ञानेश्वर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अश्विनची तपासणी केल्यानंतर तो मरण पावल्याचे सांगितले. त्याचा सहकारी ज्ञानेश्वर चव्हाण याचीसुद्धा प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.