शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मताधिक्क्याचा आलेख पुन्हा उंचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:12 IST

१९८९ मध्ये भाजपच्या पांडुरंग फुंडकरांनी प्रस्थापित केलेला रेकॉड २०१९ मध्ये संजय धोत्रे यांनी तोडला आहे.

- संजय खांडेकर

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप मताधिक्क्याचा आलेख पुन्हा एकदा कमालीचा उंचावला आहे. १९८९ नंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या निकालाची पुनरावृत्ती २०१९ मध्ये दिसून आली आहे. प्रमुख लढतीमधील दोन दिग्गज पराभूत उमेदवारांच्या मतांची एकत्रित बेरीज करूनही ते भाजपच्या विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्याचा आकडा गाठू शकले नाही. १९८९ मध्ये भाजपच्या पांडुरंग फुंडकरांनी प्रस्थापित केलेला रेकॉड २०१९ मध्ये संजय धोत्रे यांनी तोडला आहे. यंदाच्या अकोला लोकसभा निवडणूक निकालाने, १९८९ च्या लोकसभा निवडणूक निकालाची आठवण करून दिली आहे.१९८९ मध्ये झालेल्या अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक रिंगणात भारिपचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे मो. अजहर हुसेन आणि भाजपचे स्व. पांडुरंग फुंडकर होते. त्यावेळी फुंडकर ३,२२,३८४ मते घेऊन निवडून आले होते. तेव्हा हुसेन यांना १,७१,०३५ आणि अ‍ॅड. आंबेडकर यांना १,३०,२४२ मते पडली होती. हुसेन आणि आंबेडकर या दोन पराभूत उमेदवारांच्या मतांची संख्या ३,०१,२७७ एवढी होत होती. दोन्ही पराभूत उमेदवारांच्या मतांची संख्या फुंडकरांच्या ३,२२,३८४ मताधिक्क्याचा आकडा पार करू शकले नाही. त्यानंतर अशी स्थिती केवळ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कधी काळचा काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला आता भाजपचा तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. कारण भाजपच्या व्होट बँकेने मागील १९९१ ते २०१४ पर्यंतच्या मतविभाजनाची आतापर्यंतची सर्व समीकरणे बदलून टाकली आहे. या कार्यकाळात भाजपची व्होट बँक तेवढी सशक्त मुळीच नव्हती. मतांच्या विभाजनातून काँग्रेसला क्षीण करून भाजपने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भारिप (वंचित) ची आघाडी झाली तर अकोल्यातील भाजपचे उमेदवार निवडून येऊच शकत नाही, असे तेव्हा बोलले जायचे. त्याचे कारणही काहीसे तसेच होते. १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारिपच्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांनी भाजपचे उमेदवार स्व. फुंडकरांचा दोनदा पराभव केला होता. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस, भारिप पुन्हा वेगवेगळ््या लढल्या आणि भाजपचे उमेदवार संजय धोत्रे सलग आतापर्यंत निवडून येत गेले. १९८९ नंतर भाजपला प्रथमच मतदारांनी भरभरून यंदा मतदान केले आहे. ही स्थिती आगामी २०२४ मध्ये कायम राहते की नाही, हे काळच ठरविणार आहे.१९८९ ची निवडणूक अजहर हुसेन (काँग्रेस) १,७१,०३५प्रकाश आंबेडकर (भारिप) १,३०,२४२पांडुरंग फुंडकर (भाजप) ३,२२,३८४२०१९ ची निवडणूक हिदायत पटेल (काँग्रेस) २,५४,३७०प्रकाश आंबेडकर (वंचित) २,७८,८४८संजय धोत्रे (भाजप) ५,५४,४४४

 

टॅग्स :akola-pcअकोलाBJPभाजपाSanjay Dhotreसंजय धोत्रेBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर