शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा जिल्हाभरात घंटानाद; धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:03 IST

शनिवारी जिल्हाभरात भाजपसह विविध हिदुत्ववादी संघटनांच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.

अकोला: संसर्गजन्य कोरोनाच्या पृष्ठभूमिवर राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली असून, पुजेसाठी केवळ पुजाऱ्यांना परवानगी आहे. याउलट इतर बहुतांश व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यामध्ये दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. धार्मिक स्थळांच्या बाबतीत राज्य सरकारचा दुजाभाव लक्षात घेता धार्मिक स्थळे तातडीने खुली करण्याची मागणी लावून धरत शनिवारी जिल्हाभरात भाजपसह विविध हिदुत्ववादी संघटनांच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.संसर्गजन्य कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. या दरम्यान सर्व उद्योग, व्यवसाय, दळणवळण संपूर्णत: ठप्प होते. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर १ जुलैपासून ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात काही महत्त्वाचे उद्योग-व्यवसाय निर्धारित वेळेसाठी सुरूकरण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर काही निर्बंध शिथिल करण्यात येऊन पुन्हा काही व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये चक्क दारू विक्रेत्यांनाही परवानगी दिल्याचे समोर आले. अर्थात, कोरोना विषाणूच्या प्रसाराला एकमेकांचा संपर्क कारणीभूत असताना दारू विके्रत्यांना व्यवसाय करण्याची मुभा दिली असली तरी राज्यभरातील धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यावर निर्बंध कायम आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता राज्य सरकारने नागरिकांसाठी धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी लावून धरत शनिवारी जिल्हा भाजपच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आंदोलनात सामील झाल्या होत्या.शहरात विविध ठिकाणी घंटानादशहरात भाजपचे लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष तसेच महापौर यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठे राम मंदिर, जैन मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राणी सती धाम, विठ्ठल मंदिर, संतोषी माता मंदिर, गुरूद्वार यांसह इतर धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी श्रीराम नवमी शोभायात्रा समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छावा संघटना, ब्राह्मण महासंघ, शीख बांधव तसेच जैन समाज बांधवांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाagitationआंदोलन