शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेच्या मुद्यावर भाजप-सेना सदस्यांमध्ये जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:13 IST

शिवसेना सदस्याने आक्रमक भूमिका घेतल्याने, स्थायी समिती सभापती आणि या सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

अकोला: अमृत योजनेंतर्गत जुनी पाइपलाइन बदलवून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शिवसेना सदस्याने उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. शिवसेना सदस्याने आक्रमक भूमिका घेतल्याने, स्थायी समिती सभापती आणि या सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.मंगळवारी मनपा स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या जुनी पाइपलाइन बदलवून नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याच्या मुद्यावर शिवसेना सदस्य गजानन चव्हाण यांनी आक्रमक होत, संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांवर कारवाईची मागणी उचलून धरली. चव्हाण यांनी पाइपलाइन बदलविण्याचे काम संथ गतीने होत असल्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी पुरवठा बंद आहे. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने, त्यांनी स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांना जाब विचारला. त्यामुळे नगरसेवक चव्हाण आणि सभापती मापारी यांच्यातच जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना सदस्यांनी अमृत योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटदार व अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सभापती विनोद मापारी यांनी नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी यासाठी बैठक आयोजित करण्याचे सभेत सांगितल्यावर शिवसेनेचे सदस्य शांत झाले. भाजपचे अनिल गरड यांनीसुद्धा अमृत योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कंत्राटदार व संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली; परंतु गरड व शिवसेनेचे चव्हाण यांनी कंत्राटदाराला दंड ठोठावून अधिकाºयांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. यासोबतच भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी घरकुलांचा प्रश्न निकाली काढण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगत, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. भाजप नगरसेवक हरीश काळे यांच्यासह इतर सदस्यांनी पथदिवे लावण्याचे काम संथ गतीने होत असून, कामाला गती देण्याची मागणी केली. करवसुलीलाही गती देण्याची मागणी सदस्यांनी केली. भाजपचे अनिल गरड यांनी आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात काय कारवाई केली, याविषयी अधिकाºयांना जाब विचारला. बडतर्फ सफाई कामगार लता रिल यांच्या अपील अर्जावर सभागृहात चर्चा करण्यात आली. सफाई कामगार लता रिल यांचा अर्ज सभागृहाने फेटाळून लावला.

नगरसेवक गरड यांचा जलप्रदाय विभागाला टाळे लावण्याचा इशाराभाजपचे स्थायी समिती सदस्य अनिल गरड यांनी नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने, काही भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलप्रदाय विभागाने पाणी पुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास जलप्रदाय विभागाला टाळे लावण्याचा इशारा दिला. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानासुद्धा भाजपच्या नगरसेवकाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे. यावरून महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.नऊ महिन्यांपासून देयकेच नाहीत!भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी शहरातील सर्वच भागांत नागरिकांनी नळांना मीटर लावले; परंतु ढिसाळ कारभारामुळे गत नऊ महिन्यांपासून नागरिकांना पाण्याची देयकेच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत, नागरिकांना विनाकारण याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर जलप्रदाय विभागातील अधिकाºयांनी नागरिकांना अ‍ॅव्हरेज बिल देण्यात येईल, असे सांगितले.केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या अभिनंदनाचा ठरावअकोल्याला प्रथमच खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. ही बाब अकोला शहरासाठी अभिमानास्पद असून, खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेविका अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी मांडला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना