युतीमुळे विधानसभेसाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:10 PM2019-03-29T13:10:10+5:302019-03-29T13:10:20+5:30

युतीमुळे शिवसेनेच्या वाटेला जिल्ह्यातील किमान दोन विधानसभा मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार, या विचारातून भाजपमधील इच्छुकांसह सेनेतील अंतर्गत विरोधकांनीही कुटनीतीचा प्रारंभ केल्याचे बोलल्या जात आहे.

bjp-shivsena alliance pour water on those who asperant of assembly election | युतीमुळे विधानसभेसाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी

युतीमुळे विधानसभेसाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी

Next

- आशिष गावंडे
अकोला: केंद्रासह राज्यातील युती सरकारवरील संभाव्य धोका ओळखून एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप-शिवसेनेचे अचानक मनोमिलन झाले आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले. युतीमुळे शिवसेनेच्या वाटेला जिल्ह्यातील किमान दोन विधानसभा मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार, या विचारातून भाजपमधील इच्छुकांसह सेनेतील अंतर्गत विरोधकांनीही कुटनीतीचा प्रारंभ केल्याचे बोलल्या जात आहे. हा प्रकार पाहता जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची नेमकी अडचण कोणाला, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
भाजपाने साडेचार वर्षे केलेल्या टिकेचा शिवसेनेने त्यांच्या खास शैलीत समाचार घेऊन आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे फर्मान जारी केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून पक्षाची तटबंदी मजबूत केली. याला अकोला जिल्हा अपवाद नाही. सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीवर जोर दिला. दुसºया बाजूने भाजपनेसुद्धा कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट विणण्याकडे लक्ष दिले. राजकारणात आणि प्रेमात काहीही होऊ शकते, या उक्तीप्रमाणे भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. यादरम्यानच्या क ाळात दोन्ही पक्षांतील पदाधिकाºयांनी विधानसभेच्या अपेक्षेने संघटन मजबूत केल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे. याचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळत आहेत. महायुतीमध्ये सामील प्रमुख मित्रपक्ष शिवसेनेला पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे काम भाजपमधून केल्या जात आहे, तर शिवसेनेच्या काही प्रमुख पदाधिकाºयांचे भाजप नेत्यांसोबत असणारे सौहार्दपूर्ण संबंध भाजपसह सेनेतील अनेकांना खटकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी खेळल्या जात आहे, हे तेवढेच खरे.

अकोट सोडल्यास पुनर्वसनाचे ‘टेन्शन’
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातील अकोट विधानसभा मतदारसंघ भाजपने मिळविला. सेनेने अकोटसाठी तगादा लावून धरल्यास भाजपसमोर विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पुनर्वसनाचे ‘टेन्शन’ राहील. त्यांच्या तिकिटावर गंडांतर आल्यास दर्यापूर मतदारसंघातील घडामोडी बदलतील, अशी शक्यता आहे. त्यांच्या वयाचा विचार करता पक्ष काय निर्णय घेते, यावरही पुढील समीकरणे अवलंबून राहतील.


मतदारसंघ निसटण्याची धास्ती
आज रोजी बाळापूर विधानसभा मतदारसंघांपैकी अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. शिवसंग्रामच्या खेळीमुळे २०१४ च्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातून भाजपचे तेजराव थोरात यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. युती झाल्यामुळे थोरात यांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जाण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title: bjp-shivsena alliance pour water on those who asperant of assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.