शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला!

By admin | Updated: October 15, 2015 02:39 IST

जिल्हाध्यक्ष, महापौरांसह स्थानिक पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलाविले.

अकोला- राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला पोहोचले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास निर्माण होणार्‍या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह महापौर आणि स्थानिक पदाधिकार्‍यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तारूढ झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद झाले आहेत. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून सत्तापक्षांतील मतभेद विकोपाला गेले आहेत. वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला असून, त्यापृष्ठभूमिवर मुंबईत बैठकाही सुरू झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यात भाजपला काही धोका आहे का, हे जाणून घेण्यासोबतच संभाव्य परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलविण्यात आले. गुरुवारी मुंबईत या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल आणि काही प्रमुख पदाधिकारी रात्री ९ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झालेत.

आमदार मुंबईत

जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आमदारांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. शिवसेनेच्या भूमिकेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना मुंबईतच थांबवून घेण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारीही मुंबईला रवाना सत्तेत निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे शिवसेनेतसुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना तातडीने मुंबईत बोलाविण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बुधवारी मुंबईला रवाना झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही बोलाविले!

शिवसेना आणि भाजपमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे राज्यात उद्भवणार्‍या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही मुंबईला बोलाविण्यात आले असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही नेते बुधवारी मुंबईला रवाना झालेत. यात माजी आमदारांचाही समावेश आहे.