शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजप-सेनेचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:44 IST

अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांचा कौल तपासण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्यावतीने हैदराबाद व औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांचा कौल तपासण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्यावतीने हैदराबाद व औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघ वगळल्यास भाजपाला विधानसभेच्या दोन मतदारसंघांत डच्चू मिळणार असून, त्या ठिकाणी शिवसेनेचे पारडे जड राहणार असल्याचे संकेत आहेत. या सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे.कर्जमाफी असो वा शेतमालाला हमीभाव देण्याच्या मुद्यावरून राज्य सरकारचे कुचकामी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेत येण्यापूर्वी कापूस, सोयाबीन, तूर-हरभरा आदींसह इतर पिकांना हमीभाव देण्याच्या वल्गनेचा भाजप-शिवसेनेला विसर पडल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे. शेतमालाची आॅनलाइन नोंदणी केल्यानंतर खरेदीसाठी तब्बल वीस-वीस दिवस झुलवत ठेवण्याच्या युती सरकारच्या कारभारावर शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. यात भरीस भर म्हणून केंद्र शासनाने नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय घेतल्याने लहान उद्योजक, व्यावसायिकांचे कंबरडे मोडल्याचे बोलल्या जाते. एकूणच, केंद्र व राज्यातील युती सरकारच्या कारभारासंदर्भात निर्माण झालेल्या जनमतामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाºया उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एप्रिल २०१४ मध्ये लोकसभा व त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली होती. या दोन्ही निवडणुकांचा कालावधी लक्षात घेता स्थानिक भाजप व शिवसेनेच्यावतीने जिल्हावासीयांचा कौल घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. भाजपकडून हैदराबाद व सेनेकडून औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून जिल्ह्यात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.उमेदवारांची ‘मातोश्री’वरून चाचपणीअकोला लोकसभा मतदारसंघ व जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची थेट ‘मातोश्री’वरून चाचपणी करण्यात आल्याची माहिती आहे. औरंगाबाद येथील एजन्सीच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल मानल्या जात आहेत....दोन मतदारसंघ अडचणीतभाजपसाठी हैदराबाद येथील एजन्सीमार्फत सर्व्हे करण्यात आल्याची माहिती आहे. अक ोला लोकसभा मतदारसंघाबाबत सर्व्हेमध्ये अनुकूल मत नोंदविण्यात आले असले तरी जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघ अडचणीत असल्याचे बोलल्या जाते. पक्षांतर्गत वादापायी विधानसभेचा एक मतदारसंघ भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक