शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या तयारीने शिवसेनेत अस्वस्थता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:17 IST

भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देअकोल्यात आधीच भाजपाने पाचपैकी चार मतदारसंघ जिंकून सेनेसमोर अडचण उभी केली आहे. भाजपा सर्व जागांचीच तयारी करीत असल्याने युतीधर्मच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.बाळापूर, अकोट किंवा शहरी भागातील अकोला पश्चिम यापैकी दोन मतदारसंघांचा गुंता आहे.

अकोला: गेली साडेचार वर्षे एकमेकांचे उणेदुणे काढत भाजपा, शिवसेनेने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करून घवघवीत यश मिळविले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहील, यात शंका नसतानाच भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अकोल्यात आधीच भाजपाने पाचपैकी चार मतदारसंघ जिंकून सेनेसमोर अडचण उभी केली आहे. त्यातच आता भाजपा सर्व जागांचीच तयारी करीत असल्याने युतीधर्मच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार २२० च्या पार’, असे ध्येय ठेवत २८८ जागांवर तयारी करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या निर्देशावरून सध्या युतीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजपाने स्वबळावर सर्व मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखत रणशिंग फुंकले होते; मात्र ऐनवेळी भाजपा, सेना एकत्र आल्याने आता भाजपाला स्वबळाचा नारा सोडून देत युतीधर्म पाळावा लागला. आताही सर्व जागांच्या माध्यमातून स्वबळाचाच नारा दिला आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापूर वगळता भाजपाने चार मतदारसंघांत विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला हवे असलेले बाळापूर, अकोट किंवा शहरी भागातील अकोला पश्चिम यापैकी दोन मतदारसंघांचा गुंता आहे. त्यात स्वबळाची भाषा सुरू झाल्याने अनेक इच्छुकांना मात्र संधी दिसत आहे.सध्या शिवसेनाही स्वबळाचीच तयारी करीत आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्डासाठी शाखा सुरू करून बुथनिहाय बांधणी केली जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील एकही गाव यामधून सुटणार नाही, अशी काळजी घेण्याचे निर्देश प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्यांना दिले असल्याने शिवसेनाही आपले नेटवर्क मजबूत करताना दिसत आहे. दुसरीकडे सर्वच इच्छुक उमेदवारही मतदारसंघात नियमित संपर्क ठेवून आहेत. युती व जागा वाटपासंदर्भातील निर्णय हा वरिष्ठ स्तरावर होईल. तो दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मान्य करतीलच. प्रत्येक पक्ष आपले नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार आम्हीही प्रत्येक गावात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले असून, बुथ व वॉर्ड हा निकष ठेवून संघटनेची बांधणी करून सज्जता केली आहे.नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपाShiv Senaशिवसेना