अकोला : अस्मानी आणि सुलतानी संकटाने पिचलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना शासनाने वाºयावर सोडले आहे. शेतमालास हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकºयांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यां च्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी शेतकरी जागर मंचाने सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून, या आंदोलनाअंतर्गत जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतली आहे.शेतकº्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत ठरल्याप्रमाणे सोमवारी जिल्हाभरातील शेतकरी येथील गांधी-जवाहर बागेत एकवटले. येथून कालपासून अकोल्यात तळ ठोकून बसलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकºयांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले. प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला. गांधी-जवाहर बागेत शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे , शिवाजी म्हैसने, महादेवराव भुईभार,मनोज तायडे, ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
भाजपा नेते यशवंत सिन्हा व शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या!
By atul.jaiswal | Updated: December 4, 2017 22:15 IST
अकोला : जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतली आहे.
भाजपा नेते यशवंत सिन्हा व शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या!
ठळक मुद्देमागण्या मान्य होईपर्यंत अकोल्यात ठाण मांडण्याचा निर्धारशेतकरी जागर मंचाच्या झेंड्याखाली एकवटले शेतकरीपोलिसांचा तगडा बंदोबस्त