शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

भाजपने विदर्भातील जनतेचा अपमान केला - वामनराव चटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:44 IST

विदर्भ राज्य आंदोलन समिती चार संघटना, पाच राजकीय पक्षांच्या सोबतीने लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी विदर्भात २ ते १२ जानेवारीदरम्यान जनजागृती यात्रा काढली जात आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी येथे सांगितले.

अकोला: गेल्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन देत विदर्भाच्याच नावाने भाजपने निवडणूक लढवली. मतदारांनी प्रामाणिकपणे साथही दिली. त्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी वेगळा विदर्भ अजेंड्यावर नाही, असे सांगत विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. जनतेच्या फसवणुकीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती चार संघटना, पाच राजकीय पक्षांच्या सोबतीने लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी विदर्भात २ ते १२ जानेवारीदरम्यान जनजागृती यात्रा काढली जात आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या काळात केल्या जाणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली.सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्येही ते होणार आहे. भाजपाने वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची घोषणा करून लोकसभेत ठराव घ्यावा, त्यातून विदर्भातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे आवाहनही अ‍ॅड. चटप यांनी केले. केंद्र शासनाने वेगळ््या विदर्भाची मागणी पूर्ण न केल्यास २०१९ मध्ये होणाºया लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका विदर्भ राज्य आंदोलन समिती लढवणार आहे. त्यामध्ये विदर्भवादी असलेले पाच पक्ष, चार संघटना सहभागी आहेत. तसेच विदर्भवादी नेते, कार्यकर्ते, विदर्भातील शेतकरी संघटनाही सहभागी आहेत, असेही अ‍ॅड. चटप यांनी सांगितले. यावेळी रंजना मामर्डे, सुरेश जोगडे, संतोष देशमुख, मनोज तायडे, शंकर कवर, डॉ. नीलेश पाटील उपस्थित होते.- पश्चिम, पूर्व विदर्भात यात्रावेगळ््या विदर्भाच्या मुद्द्यावर जनजागृतीसाठी नागपूर येथून २ जानेवारी रोजी पश्चिम आणि पूर्व विदर्भात एकाच वेळी यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये ३ जानेवारी रोजी यात्रा अमरावती येथे येणार आहे. ४ जानेवारी-अकोला, बाळापूर, खामगाव, नांदुरा, मलकापूर. ५ जानेवारी- मोताळा, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा. ६ जानेवारी-लोणार, मेहकर, रिसोड, मालेगाव, वाशिम. ७ जानेवारी- मंगरुळपीर, कारंजा लाड, बार्शीटाकळी, अकोट. ८ जानेवारी-अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड. ९ ते १२ जानेवारीदरम्यान यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.- समितीमध्ये सहभागी संघटना, पक्षविदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, नागविदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष, प्रहार जनशक्ती, खोरिप आंदोलनात सहभागी आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWamanrao Chatapवामनराव चटपPoliticsराजकारणBJPभाजपा