शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:32 IST

गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले.

अकोट(अकोला) :  केंद्रात व राज्यात भाजप - सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यानंतर आपलेच सरकार येणार आहे, त्यामुळे आगामी निवडणूकीत अब की बार, बस कर यार ! असा नारा महाराष्टÑ काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले. अकोट येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे दरम्यान स्थानिक खरेदी विक्री मैदानात सभा पार पडली. यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत तर नाहीच परंतु जीएसटीचा कायदाही शेतकºयांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजाराच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर देशात ५० हजाराच्यावर हा आकडा गेला आहे,असेही चव्हाण यांनी सांगितले.

पंधरा लाख कुठे गेले- विखे पाटीलविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री, आमदार असतांनाही शेगावपासून अकोट या रस्त्याची दुर्दशा पाहता या भागातील रस्त्यांमुळे आजारात वाढ झाली आहे. विकासात वाढ झाल्याचे मात्र कुठे चित्र दिसत नाही. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना १५ लाख रुपये प्रत्यकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कोणाच्याही खात्यात एक रुपया आला नाही, उलट नोटांचे रंग बदलले, शेतकºयांना सरसगट कर्जमाफी नाही, विविध प्रकारच्या योजनेचा लाभ नाही. पंधरा लाख कुठे गेले, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदेशात पळुन जाणाºया व पैसे बुडविणाºया उद्योजकांना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळाकरिता पुरेसा पैसा दिलाच नाही, अशा स्थितीत अकोट तालुकाही दुष्काळग्रस्त घोषीत करायला पाहिजे होता असे सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण