शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:35 IST

भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.

- राजेश शेगोकार अकोला: भविष्याच्या राजकारणाची पेरणी ही वर्तमानातील निर्णयांवर अवलंबून असते, असे म्हणतात. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही अकोल्याच्या भविष्यातील राजकारणाची पेरणी सुरू केली आहे. एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना या पक्षाने भाजपाच्या विरोधात उघडलेली आघाडी, आक्रमक असे पालकमंत्री अन् एकहाती सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीसाठी गठित समिती अशा घटनांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा व शहर अशा दोन्ही आघाडीवर आक्रमक चेहरा देण्याच्या प्रयत्नातूनच भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.अकोल्याच्या राजकारणात खा. धोत्रे यांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. अकोला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून त्यांनी आपली पकड दाखवून दिली. स्वत: चौथ्यांदा खासदार अन् केंद्रीय राज्यमंत्री पद ही सारी ताकद विधानसभेत लावून युतीला शत-प्रतिशत यश मिळवून दिले. दरम्यानच्या काळात राज्यात युतीचे फाटले अन् आतापर्यंत मित्र असलेला शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर आक्रमकपणे विरोधात उभा ठाकला. खा. धोत्रे यांच्या नेतृत्वात यश मिळविलेली महापालिका असेल किंवा शहरातील विकास कामे असतील, यांच्याविरोधात आक्रमकपणे आवाज उठविला गेला नव्हता. महापालिकेच्या सभेत राडा झाला की नंतर पुढच्या सभेपर्यंत शांतता असाच आतापर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास आहे. याला काही अपवादही असले तरी ते बोटावर मोजता येतील असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा लेखाजोखा थेट विधिमंडळापर्यंत नेला आहे. शौचालयांचा घोळ, फोर-जी प्रकरणात चव्हाट्यावर आलेली महापालिकेची इज्जत, करवाढीच्या प्रकरणात न्यायालयात तोंडावर आपटलेले प्रशासन, अमृत योजनेतील अनियमितता अशा एक ना अनेक प्रकरणांची पोलखोल विरोधकांनी सुरू केली आहे. आता विधिमंडळाची उपसमितीही नेमल्या गेली आहे. त्यामुळे भाजपाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आक्रमक व अभ्यासू अशा आ. रणधीर सावरकर यांची तसेच हा सारा कथित घोळ ज्यांच्या काळात झाल्याचा आरोप आहे, ते माजी महापौर यांच्या हाती जिल्हा व महानगराची सूत्रे देऊन जशास तसे उत्तर दिले जाईल, हे संकेतच भाजपाने दिले आहेत.आ. सावरकर यांनी पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक व अभ्यासू आमदार अशी ओळख निर्माण केली आहे. अकोला पूर्व हा त्यांचा मतदारसंघ असला तरी जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नावर धावून जाताना त्यांना मतदारसंघाची कधीही आडकाठी आली नाही. खा. धोत्रे हे दिल्लीत व्यस्त असल्याने येथील पक्षसंघटनेवरची पकड सैल होणार नाही, तर अधिक प्रभावी होईल, हाही प्रयत्न आ. सावरकर यांच्या निवडीमागे आहे. दुसरीकडे विजय अग्रवाल यांनी महापालिका त्यांच्या शैलीने चालविली. पक्षाकडून एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी करताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नव्हते. त्यामुळेच फाइल गहाळ प्रकरण असो की गुंठेवारीच्या प्रकरणात त्यांनी तातडीने पुढाकार घेत महापालिकेची भूमिका मांडली. आगामी काळात सेना व भाजपा हा संघर्ष चांगलाच पेटणार असल्याने पक्षाला आक्रमक नेतृत्वाची गरज होती, ती या दोघांच्या निवडीमुळे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाPoliticsराजकारणRandhir Savarkarरणधीर सावरकर