- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्क अकोला : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या मुद्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शिंदेसेनेतील काही पदाधिकाऱ्यांसंदर्भात भाजपमध्ये असलेली नाराजी, तसेच भाजपमधील इच्छुकांची गर्दी पाहता उमेदवार यादी जाहीर होताच बंडखाेरीचे मोठे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला इतर समविचारी पक्षांकडून मदतीचा हात मिळाल्यास त्यांचे राजकीय गणितही जुळू शकते, असा सूर व्यक्त होत आहे.
महायुतीतील भाजपसोबत शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाला किती जागा मिळतील, यावरून साशंकता व्यक्त केली जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची रणनीती अद्यापही गुलदस्त्यात आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेस किंवा इतर समविचारी पक्षांसोबत युती करेल की पुन्हा ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेईल, उद्धवसेना-मनसे युतीचा काय परिणाम होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरेच चित्र स्पष्ट करतील. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
कोणते मुद्दे निर्णायक?
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील वाढलेल्या मालमत्ता कराचा प्रश्न यावेळी निवडणुकीच्या प्रचारात कळीचा मुद्दा ठरणार आहे. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे झाली असली तरी डाबकी रोडचा रखडलेला प्रश्न आणि अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नावरून नागरिकांमध्ये राजी आहे. नियमित पाणीपुरवठा न होणे, चार दिवसांआड पाणीपुरवठा आणि इतर मुलभूत सुविधांसाठी आजही अकोलेकर संघर्ष करीत आहेत.
वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला हाेणार? : अकोला महापालिका क्षेत्रातील वाढलेल्या मतदारांचा लाभ प्रामुख्याने भाजप व वंचित बहुजन आघाडीला होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Akola's election sees BJP facing internal dissent and seeking alliances. Congress eyes VBA support amid uncertainty. Key issues are property tax, road conditions, and water supply.
Web Summary : अकोला चुनाव में बीजेपी आंतरिक असंतोष और गठबंधन की तलाश में है। कांग्रेस वीबीए समर्थन पर नजर रख रही है। संपत्ति कर, सड़क की स्थिति और पानी की आपूर्ति प्रमुख मुद्दे हैं।