कोरोनाच्या संकटात मातृसुरक्षेचे मोठे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:06 AM2020-07-10T10:06:07+5:302020-07-10T10:06:14+5:30

गर्भवतींमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर मातृसुरक्षेचे मोठे आव्हान आहे.

Big challenge to maternal safety in Corona crisis! | कोरोनाच्या संकटात मातृसुरक्षेचे मोठे आव्हान!

कोरोनाच्या संकटात मातृसुरक्षेचे मोठे आव्हान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. या तीन महिन्यात जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. रुग्णवाढीसोबतच मृत्युदरही लक्षणीय आहे. त्यात वृद्धांचीही संख्या जास्त आहे.
या सर्वांमध्ये मात्र, गर्भवतींमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. गर्भवतींमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर मातृसुरक्षेचे मोठे आव्हान आहे. या अनुषंगाने जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने गत तीन महिन्यात ७८४ गर्भवतींचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ७३ गर्भवतींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयातील पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच गर्भवतींना प्रसूती आणि पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित केले जाते.

शिशूला आईचे दूध चालते; पण...
नवजात शिशू फोरमच्या मार्गदर्शक अहवालानुसार, कोरोना संदिग्ध किंवा बाधित माता असेल, तरी त्या मातेचे दूध नवजात शिशूला देता येते; परंतु शिशूला दूध देण्यापूर्वी मातेने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याची गरज आहे.
कोरोनाबाधित गर्भवतींसाठी जीएमसीत कक्ष राखीव
सर्वोपचार रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून सेवा देत आहे. त्या अनुषंगाने येथील स्त्री रोग व प्रसूती विभाग कोरोनाबाधित गर्भवतींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बाधित गर्भवतींसह बाळंतिणींची विशेष नीगा राखली जाते.

लेडी हार्डिंगमध्ये दक्षता
जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील गर्भवतीदेखील प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक गर्भवतींची स्क्रिनिंग केले जाते.

अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संबंधित मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात येते. गर्भवतींना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा स्त्री रुग्णालयात आधीच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केल्याने इतरांना त्याचा धोका नाही.
- डॉ. आरती कुलवाल,
वैद्यकीय अधीक्षिका,
जिल्हा स्त्री रुग्णालय,
अकोला

 

Web Title: Big challenge to maternal safety in Corona crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.