शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावानेच केली लहान भावाची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:09 IST

पोलिसांनी मोठ्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर मनीष पाचपोर याच्या मृत्यू प्रकरणाची उकल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मद्यधुंद लहान भावाला मारहाण करून त्याचा अतिमद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचे भासवून मोठ्या भावाने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा केलेला प्रयत्न डाबकी रोड पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी मोठ्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर मनीष पाचपोर याच्या मृत्यू प्रकरणाची उकल झाली. मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत गुप्तांगासह अंडकोषाला जबर मार लागल्याने मनीष पाचपोरचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.डाबकी रोडवरील गणेश नगर येथे राहणाऱ्या मनीष पाचपोर (३५) याचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला होता. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी गुलजारपुºयातील स्मशानभूमीत सुरू असतानाच, पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी संशयाच्या आधारे चितेवरूनच मनीषचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन झाल्यावर डॉक्टरांनी मनीषला मारहाण झाली असून, मारहाणीत त्याच्या गुप्तांगसह अंडकोषाला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मनीषचा मोठा भाऊ योगेश प्रकाश पाचपोर (४0) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर, योगेशने मनीष हा नेहमीच दारू पिऊन यायचा. आई-वडील, आत्याला अश्लील शिवीगाळ करायचा. त्याची मानसिक स्थितीही बरी नसायची. शुक्रवारी रात्री मनीष दारू पिऊन आल्यावर शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडे कबूल केले आणि अतिमद्य प्राशनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे भासवित, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, अशी माहिती योगेशने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२, २0१, २0२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला शनिवारी रात्रीच अटक केली. रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)योगेशला पश्चात्ताप, दु:खही नाही!योगेश पाचपोर याला रविवारी दुपारी डाबकी रोड पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात हजर केल्यानंतर योगेश शांत होता. लहान भावाची हत्या केल्याचा पश्चात्ताप, दु:खही त्याच्या चेहºयावर दिसत नव्हते.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून