नितीन गव्हाळे / अकोला : भाईचंद हिरानंद रायसोनी (बीएचआर) मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अकोला शाखेबाबतही ठेवीदारांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अकोला शाखेने आतापर्यंत ठेवीदारांची ७0 लाख ९७ हजार 0८ रु पयांनी फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. बीएचआर सोसायटीने ह्यसुवर्णलक्ष्मीह्ण नावाची मासिक प्राप्ती योजनेंतर्गत नागरिकांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी बँकेत जमा केल्या. ठेवींची मुदत संपल्याने ठेवीदारांनी ठेवींची मागणी केली; परंतु बीएचआरच्या गांधी चौक शाखेतील कर्मचार्यांनी ठेवीदारांना ठेवी परत करण्यास नकार दिला. बीएचआर सोसायटीने गजानन धामंदे यांची १९ लाख रुपये, रामेश्वर हजारीमल अग्रवाल यांचे ९ लाख, राम उमाला राठोड यांचे १४ लाख, हाजी सिद्दीक हाजी इब्राहिम यांची ४५ हजार, हरीश जाबजीभाई माधवानी यांची २५ हजार, दीपक विश्वनाथ पांडे यांची २ लाख ५२ हजार, अतुल शेगावकर यांची ८६ हजार ४४५ रुपये आणि नितीन मनोहर कुळकर्णी यांची १ लाख १२ हजार, श्याम मोहनलाल जाजू यांची १ लाख २0 हजार, तुषार रामदास जावरकर यांचे ३ लाख ५0 हजार, सचिन गजानन लोखंडे यांचे ३ लाख १५ हजार, अयुब खान युसूफ खान यांचे ४६ हजार ५00 रुपये, नीता मुरलीधर राऊत यांचे ३ लाख ३0 हजार, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील यांचे ४ लाख ९0 हजार, संतोष विष्णूदयाल शर्मा यांचे २ लाख ६ हजार ३७२, कमलेश वाणी २५ हजार, मनोहर नारायण बोदडे यांचे ३ लाख, रमेश शंकरराव देशमुख २ लाख, अशा एकूण ७0 लाख ९७ हजार 0८ रु पयांनी फसवणूक केल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे.
*आरोपींचा ताबा मिळण्याची पोलिसांना प्रतीक्षा
बीएचआर सोसायटीमधील आर्थिक घोळ करणार्या संचालक मंडळातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांनी अर्ज सादर केलेला आहे. परंतु आरोपी ताब्यात मिळण्यासाठी कोतवाली पोलिसांना वाट पाहावी लागणार आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी सात ठिकाणचे पोलीस प्रतीक्षा करीत आहेत.