शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अघोरी उपचार करणार्‍या मांडोली येथील भोंदू बाबाला तीन वर्षांची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:33 IST

सायखेड (अकोला) : दैवी शक्ती असल्याचा बनाव करून अघोरी पद्धतीने उपचार  करणार्‍या मांडोली येथील माणिक महाराज ऊर्फ माणिक  कसनदास जाधव या भोंदू बाबाला जादूटोणाविरोधी कायद्यानुसार  बाश्रीटाकळी सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षांची सक्तमजुरी व  पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देबाश्रीटाकळी न्यायालयाचा निकालजादूटोणाविरोधी कायद्यान्वये शिक्षा

बबन इंगळे

सायखेड (अकोला) : दैवी शक्ती असल्याचा बनाव करून अघोरी पद्धतीने उपचार  करणार्‍या मांडोली येथील माणिक महाराज ऊर्फ माणिक  कसनदास जाधव या भोंदू बाबाला जादूटोणाविरोधी कायद्यानुसार  बाश्रीटाकळी सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षांची सक्तमजुरी व  पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच फसवणूक  केल्याप्रकरणी आणखी तीन वर्षे शिक्षा व दोन हजारांचा दंडही  न्यायालयाने ठोठावला. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रीतपणे  भोगाव्या लागणार आहेत. जादूटोणाविरोधी कायद्यानंतर गुन्हा  सिद्ध होऊन शिक्षा झाल्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे.  बाश्रीटाकळी तालुक्यातील मांडोली या आदिवासीबहुल गावात  माणिक महाराज हा पौर्णिमा व अमावास्येला महालक्ष्मी मंदिरात  दरबार घेत होता. तेथे तो आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे  सांगून कुठलाही मोठा आजार बरा करीत असल्याचा दावा  करीत  होता. याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाल्यानंतर  समितीच्या पदाधिकार्‍यांनी १४ मे २0१४ रोजी भोंदू बाबाचा  पर्दाफाश केला होता. तसेच डॉ. गजानन नारायण पारधी यांनी  माणिक महाराजविरुद्ध बाश्रीटाकळी पोलिसांत फिर्याद दिली हो ती. त्यांच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी माणिक  महाराजविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व  अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे  समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २0१३ च्या कलम २  (१) ख सह ३ नुसार व फसवणूकप्रकरणी भारतीय दंड विधान  कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी  बाश्रीटाकळी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही  बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी माणिक महाराज ऊर्फ माणिक  कसनदास जाधव यास दोषी ठरवून जादूटोणाविरोधी कायद्यानुसार  तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन  महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच पैसे घेऊन फ  सवणूक केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा  दंड बाश्रीटाकळी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परेश रा. वागडोळे  यांनी ठोठावला. याप्रकरणी सरकारी पक्षाची बाजू सहायक  सरकारी वकील अँड. सचिन दादाजी बेरकर यांनी काम पाहिले,  तर आरोपीतर्फे व्ही. एम. किर्तक यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक