शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, तिघांना अटक; अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:59 IST

उपचार करण्याच्या नावाखाली २७ वर्षीय महिलेवर भोंदुबाबाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी भोंदुबाबासह तिघांना अटक केली. आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले.

पातूर (जि. अकोला) - उपचार करण्याच्या नावाखाली २७ वर्षीय महिलेवर भोंदुबाबाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी भोंदुबाबासह तिघांना अटक केली. आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. पडित महिलेने पाच हजार रुपये दिल्यानंतरही भोंदू बाबाचा त्रास सुरू राहिल्याने सदर महिलेने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी औरंगाबादमध्ये जाऊन रात्री दोन वाजता भोंदुबाबासह तिघांना जेरबंद केले.औरंगाबाद येथील एक २७ वर्षीय महिलेने प्रेम विवाह करून अकोल्यात संसार थाटला होता. पतीबरोबर वाद झाल्याने ही महिला दोन मुलांसह राहत होती. पोटात दुखत असल्यामुळे ती उपचार करण्यासाठी सैलानी (जि. बुलडाणा) येथील दर्ग्यात गेली.तेथे आरोपी अखतखान रहमान खान (४१, रा. लोणार) रोशन खान (४५) कलदरखान शहानुर खान (३२, दोघेही रा. मलकापूर) या तिघांबरोबर तिची ओळख झाली. या तिघांनी तिला लिंबू व धागा दोरा देऊन उपचार केला आणि एक मोबाइलसुद्धा दिला व संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला शुक्रवारी लोणार येथे बोलावून उपचार केल्यानंतर गाडीत बसवून पातूर येथील शहाबाबू दर्ग्यामध्ये दर्शनासाठी आणले.दर्शन झाल्यानंतर मुलांना गाडीत बसून ठेवून तिला मागच्या बाजूस जंगलात नेले व गाडीतच गुंगीचे औषध देऊन तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. तिचे अर्धनग्न फोटोसुद्धा काढले. तिच्या व्हॉटस्अ‍ॅपवर तिचे अर्धनग्न फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले व दहा हजाराची मागणी केली.तिने त्यापैकी पाच हजार रुपयेसुद्धा दिले; परंतु तरीही आरोपींनी उर्वरित पैसे देण्यासाठी पीडितेला त्रास देणे सुरू केले,तसेच बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा