शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव घटनेचे अकोला जिल्ह्यातही पडसाद; आकोट, लोहाऱ्यात बसची तोडफोड, अकोल्यात बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:43 IST

अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले.

ठळक मुद्देसंतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे काही युवकांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये चार प्रवाशी जखमी झाले.तेल्हारा, बाळापूरात युवकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.

अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला. तर आकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.भीमा कोरेगाव येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादावरून दगडफेक झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अकोला शहरात काही युवकांनी सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, रतनलाल प्लॉट चौक, केडीया प्लॉट, नवीन कपडा बाजार परिसरातून मोर्चा काढला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्ह्यातील संवेदनशिल असलेल्या बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे काही युवकांनी परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये चार प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी लोहारा येथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

अकोट येथे संतप्त युवकांनी अंजनगाव रोड नाक्याजवळ अकोला- परतवाडा बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. बसमधील प्रवासी सुरक्षीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तेल्हाºयात युवकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. बाळापूर येथेही पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेभीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध करीत अकोल्यातील संतप्त युवकांनी शहरातून मोर्चा काढला. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शेकडो युवकांची उपस्थिती होती. युवकांच्या निदर्शनांनी परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावAkola cityअकोला शहरakotअकोटTelharaतेल्हारा