शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बंडोबां’ना रोखण्यासाठी ‘भारिप’ ची त्रिसदस्यीय समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 10:19 IST

अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे काही गट आणि पंचायत समित्यांच्या काही गणांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यात बैठका घेऊन, बंडखोर उमेदवारांना पक्षाची भूमिका पटवून सांगण्याच्या सूचना भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि संबंधित गटांच्या पंचायत समित्यांच्या गणांमध्ये गट व गणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत, पार्सल उमेदवारांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या संबंधित गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. भारिप-बमसंच्या नाराज अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत ‘पॅनल’ देखील तयार केले आहेत.या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २७ डिसेंबर रोजी पत्राद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात बैठका घेऊन पक्षाचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवारांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी बंडखोर अपक्ष उमेदवारांना रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.अशी आहे त्रिसदस्यीय समिती!बंडखोर अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी भारिप-बमसंच्यावतीने त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व दामोदर जगताप यांचा समावेश आहे. या समितीसोबतच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे, जिल्हा महासचिव डॉ.एम.आर. इंगळे यांनीसुद्धा पक्षाच्या नाराज अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी प्रयत्न करून, त्यासंदर्भात सूचना देण्याचेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संबंधितांना सांगीतले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर