शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

भरधाव बोलेरोची दुचाकीला जबर धडक, सहा जण जखमी, दक्षता नगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 21:18 IST

नेहरु पार्क चौकातून वाशिम बायपासकडे जात असलेल्या एका भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने  दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

अकोला - नेहरु पार्क चौकातून वाशिम बायपासकडे जात असलेल्या एका भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने  दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात ८ जन जखमी झाले असून दोघांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयामध्ये तर बोलेरो वाहनातील सहा जणांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात बोलेरो चारचाकी वाहन तीन ते चार वेळा पलटी झाल्यानंतर ते रोडच्या खाली जाउन कोसळले.

सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी यांचे पती राजु विश्वंभर मोगली पिल्लू हे दोन वर्षीय चिमुकला मुलगा गणेश राजू मोगली पिल्लू चिमुकला याला सोबत घेउन पत्नीला घेण्यासाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात एम एच ३० एयू १६२५ क्रमांकाच्या दुचाकीने दक्षता नगरमधून निमवाडीकडे जात असतांना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या एम एच ३० एझेड २३५ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने जबर धडक दिली. 

या अपघातात दुचाकी दुरवर फेकल्या गेल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरो चारचाकी वाहनाने तीन ते चार पलटी खाउन हे वाहन रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर या वाहनामधील चार जन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या सहाही जनांना तातडीने उपचरासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी खदान पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जखमींना उपचरासाठी रुग्णालयात पाठवून वाहनांची तपासणी केली. यामधील बोलेरो वाहनात  मद्याची दुर्गंधी आली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसात तक्रार झालेली नव्हती.