सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे

By Atul.jaiswal | Published: June 8, 2019 04:38 PM2019-06-08T16:38:16+5:302019-06-08T16:41:27+5:30

महानिर्मितीच्या ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे.

Best performance; Paras thermal power center Fourth in the country | सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे

सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक आहे.

अकोला : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.
सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश (प्रथम-१००.०४ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.५२ भारांक), रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश (तृतीय -९७.८२ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (९६.९३ भारांक) असा क्रम आहे.
सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो. पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. पारस वीज केंद्राला वेकोलि, महानदी कोल फिल्ड्स आणि एस.ई.सी.एल. च्या खाणींतून कोळसा पुरवठा करण्यात येतो. विविध तांत्रिक समस्यांवर वेळेत मात करून येथील कुशल मनुष्यबळाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा/कौशल्याचा परिचय दिला आहे.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

संचालक पाच सूत्री कार्यक्रमा अंतर्गत कमी कोळसा वापर, झिरो कोल डेमरेज, परिसरातील वातावरण सुधारणा व नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याने पारस वीज केंद्राची उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल होत आहे आणि महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक आहे.
- डॉ.रविंद्र गोहणे , मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र, पारस

 

Web Title: Best performance; Paras thermal power center Fourth in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.