शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारांवरील छापेमारीनंतर फौजदारी कारवाईला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:29 IST

जिल्हा उपनिबंधक लोखंडे याच्या कार्यकाळात झालेल्या कारवायांमध्ये संशयाचे धुके निर्माण झाले आहेत.

अकोला : सहकार विभागाचा लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याच्याकडे जिल्ह्यातील अवैध सावकार तसेच हुंडी चिठ्ठी दलालांविरोधात झालेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाने छापेमारी केली; मात्र त्यानंतर ज्या हुंडी चिठ्ठी दलाल आणि अवैध सावकारांकडून रोकड, धनादेश, खरेदी खत तसेच इतर वादग्रस्त दस्तावेज जप्त केल्यानंतरही फौजदारी कारवाईला पद्धतशीररीत्या बगल दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक लोखंडे याच्या कार्यकाळात झालेल्या कारवायांमध्ये संशयाचे धुके निर्माण झाले आहेत.जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने राजेश राठी आणि संतोष राठी यांच्या कार्यालयांसह प्रतिष्ठांनावर धाडी टाकून तीन दिवस कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान २५ लाख रुपयांच्या रोकडसह धनादेश, खरेदी खत, कोरे धनादेश, गहाण खत यासह दस्तावेज जप्त केले होते. त्यानंतर या दोघांविरुद्धचा अहवाल प्राप्त होताच फौजदारी कारवाई करण्याचे जाहीर केले होते; मात्र वेळ मारून नेत बराच कालावधी उलटल्यानंतर या प्रकरणात फौजदारी कारवाईकडे अर्थपूर्ण कानाडोळा केल्याची चर्चा आहे. त्यानंतर जून महिन्यातच अवैध सावकारीच्या तक्रारीवरून एसटी कॉलनीतील नरेंद्र गुणवंतराव देशमुख, म्हैसांग येथील भानुदास गजानन पवार आणि मुकुंद नगरातील किशोर भुजंगराव देशमुख यांच्याकडेही छापेमारी केली होती; मात्र सदर प्रकरणातही फौजदारी कारवाईला बगल देण्यात आली आहे. या पाच छापेमारीासह अनेक प्रकरणात अशाच प्रकारे छापेमारी करणे आणि त्यानंतर फौजदारी कारवाईस टाळाटाळ केल्याचा प्रकार जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे रुजू झाल्यापासून सुरू होता. या प्रत्येक छापेमारीच्या वेळी त्याच्यासोबत विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीतसिंग सेठी हा सोबत असायचा, हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे लोखंडे याने अशा प्रकारे फौजदारी कारवाई न केल्याने काही तक्रारकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दोन दिवसांपूर्वी धडक देऊन आंदोलनही केले हे विशेष.

पुन्हा चौकशीची मागणीजिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने अवैध सावकार तसेच हुंडी चिठ्ठी दलालांवर केलेल्या कारवाया अर्धवट असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला असून, या सर्व प्रकरणांची नव्याने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी सावकारी नसतानाही त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करून तोड्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी