शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण; मूर्तिजापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष दिनेश दुबे याला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:26 IST

Crime News : प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

मूर्तिजापूर : येथील नगर परिषद आवारातील लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु असताना उपस्थित दिनेश दुबे व सहकाऱ्यांनी उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धमकावून मारहाण केल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. यासंदर्भात मूर्तिजापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला; परंतु घटने दरम्यान दिनेश दुबे हा फरार होता व त्याने न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळविला. त्या नंतर पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार  न्यायालयाने १६ जुलै रोजी जामीन नामंजूर  केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.               ३१ मे रोजी सकाळी येथे लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत सुरू असताना शहर कॉंग्रेसचा अध्यक्ष दिनेश दुबे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. लसीकरणाच्या कारणावरून उपस्थित डॉक्टर हेमंत तायडे यांना आरोपीनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. लसीकरणादरम्यान राडा होऊन लसीकरण ठप्प झाले, तर पोलीसांनी राडा करणाऱ्या प्रेम दुबे, सागर दुबे आरोपींना अटक केली दरम्यान तिसरा आरोपी कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष दिनेश दुबे फरार झाला होता. दिनेश दुबे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचेवर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गत वर्षापुर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. तर शासकीय कामात अडथळे निर्माण करण्यासंदर्भात त्याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने शुक्रवारी त्याचा जामीन रद्द केल्या नंतर तो मलकापूर वरुन रेल्वेने मुंबई येथे पळून जात असताना मूर्तिजापूर शहर पोलीसांनी मलकापूर पोलीसांच्या मदतीने त्याला मलकापूर येथून अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.          ३१ मे रोजी कोविशिल्डच्या दुसरा डोज देण्याची प्रक्रिया सुरु  असताना प्रेम दुबे व सागर दुबे यांनी नोंदणी करणारे हेमंत तायडे यांच्याशी वाद घातला. नोंदणी करतांना संबंधितास रांगेतील मागच्या व पुढच्या व्यक्तीविषयी का विचारता? असा सवाल उपस्थित करून अर्वाच्च शिविगाळ केली. उपस्थित नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरीही शिवीगाळ सुरूच होती. काही वेळाने लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या दिनेश दुबे याने हेमंत तायडे यांना जोरदार मारहाण केली. हा प्रकार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना कळताच त्यांनी पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. डॉ. विजय पांडुरंग वाडेकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रेम व सागर दुबे यांना तात्काळ अटक करण्यात आली होती. तर शहर कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष असलेला दिनेश दुबे फारार झाला होता. पुन्हा फरार होण्याच्या तयारीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत व ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व सहकाऱ्यांनी मलकापूर येथून अटक केली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी